कोरोनामुळे नव्हे; चक्क या कारणामुळे खालापूर तालुक्यातील गाव क्वारंटाईन 

मनाेज कळमकर
Sunday, 30 August 2020

चौक लोहप मार्गावर सारंग गाव आहे. गावातून वाडीकडे जाणाऱ्या मार्गावर तलावानजीक बिबट्या दिसल्याचे रघुनाथ बामणे या ग्रामस्थाने सांगितले. त्यानंतर पुन्हा गावातील काही ग्रामस्थांना दोन बछड्यांसह बिबट्या दिसला. त्यामुळे गावात भीतीचे वातावरण आहे.

खालापूर  : तालुक्‍यातील चौक हद्दीतील सारंग गावात बिबट्याचे या आठवड्यात दोन वेळा दर्शन झाले. त्यामुळे या गावातील नागरिकांना सक्तीने "क्वारंटाईन' व्हावे लागले आहे. कोरोनामुळे अनेकांना क्वारंटाईन व्हावे लागत असताना चक्क बिबट्याच्या दहशतीमुळे रहिवाशांवर ही वेळ आल्याने याबाबत चर्चा सुरू आहे.

धक्कादायक : हिवाळ्यात कोरोनाचा कहर?

चौक लोहप मार्गावर सारंग गाव आहे. गावातून वाडीकडे जाणाऱ्या मार्गावर तलावानजीक बिबट्या दिसल्याचे रघुनाथ बामणे या ग्रामस्थाने सांगितले. त्यानंतर पुन्हा गावातील काही ग्रामस्थांना दोन बछड्यांसह बिबट्या दिसला. त्यामुळे गावात भीतीचे वातावरण आहे. ग्रामपंचायतीने तत्काळ वनविभागाला माहिती दिल्यानंतर वनाधिकारी आशीष पाटील यांच्यासह कर्मचाऱ्यांनी सारंग गाव आणि परिसरात शोधमोहीम राबवली; परंतु बिबट्याच्या खाणाखुणा आढळल्या नाहीत; परंतु ग्रामस्थांना सतर्क राहण्याच्या सूचना वनविभागाने दिल्या आहेत. 

हे वाचा : म्हातारीचे काय करायचे हे राहुल गांधींनी ठरवावे : राऊत

आशीष पाटील यांनी सांगितले की, सारंग गाव परिसरात जंगल नाही. त्यामुळे बिबट्याच्या वास्तव्याबाबत सर्व शक्‍यता तपासून पाहत आहोत. मादी आणि दोन पिल्ले असल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत. वनविभाग लक्ष ठेवून आहे. ग्रामस्थांना सतर्क राहण्यास सांगितले आहे. 
ग्रामस्थांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले की, बिबट्याची दहशत आहे. त्यामुळे घराबाहेर पडणे मुश्किल आहे. वन विभागाने याकडे तातडीने लक्ष देणे आवश्यक आहे. 

(संपादन : नीलेश पाटील)

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Resident of Khalapur taluka Quarantine a for fear of leopards