esakal | दिमाखदार कार्यक्रमात घरांच्या चाव्या दिल्या; घरांचा पत्ताच नाही...
sakal

बोलून बातमी शोधा

दिमाखदार कार्यक्रमात घरांच्या चाव्या दिल्या; घरांचा पत्ताच नाही...

ठाणे शहराचा विकास करताना विविध योजना राबविण्यासाठी सत्ताधारी शिवसेनेने सातत्याने पुढाकार घेतला आहे. मात्र काही योजना केवळ घोषणांपुरत्या मर्यादित असल्याची चर्चा सुरू आहे.

दिमाखदार कार्यक्रमात घरांच्या चाव्या दिल्या; घरांचा पत्ताच नाही...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

ठाणे : शहराचा विकास करताना विविध योजना राबविण्यासाठी सत्ताधारी शिवसेनेने सातत्याने पुढाकार घेतला आहे. मात्र काही योजना केवळ घोषणांपुरत्या मर्यादित असल्याची चर्चा सुरू आहे.

एक महिन्यापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत अपंग आणि बीएसयूपी (शहरी गरिबांसांठी मूलभूत सुविधा) योजनेतील रहिवाशांना घरांची चावी देण्याचा कार्यक्रम करण्यात आला. पण एक महिन्यानंतरही या रहिवाशांना अद्याप घरांचा ताबा मिळालेला नाही.

ही बातमी वाचा ः विधानसभा अध्यक्ष नाना पटोले भडकलेत; अजित पवारांनी मागीतली माफी

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात पालिकेतील काही स्थानिक नेत्यांना योग्य ती प्रसिद्धी न मिळाल्याने पुन्हा कार्यक्रम घेणार असल्याची चर्चा पालिकेत  आहे. शहरातील रस्त्यांचे रुंदीकरण करताना अनेकांची घरे पाडताना त्यांना बीएसयूपीची घरांचे आश्वासन दिले होते. मात्र अद्याप त्यांना घरांचा ताबा मिळाला नाही.

‘आपला दवाखाना’ योजनेकडे लक्ष
त्याचबरोबर दिल्लीतील मोहल्ला क्‍लिनिकच्या धर्तीवर ठाण्यात आपला दवाखाना सुरू करण्यात आला आहे. याचे पहिले दोन प्रयोग फसले आहेत. असे असताना शहराच्या विविध भागात अशा स्वरूपाचे पन्नास दवाखाने सुरू करण्याच्या निमित्ताने त्याचेही लोकार्पण करण्यात आले आहे. परंतु महिना उलटल्यानंतरही घाणेकर नाट्यगृह परिसरातील दवाखान्याचा डेमोवरच सर्व कारभार सुरू आहे.