मुंबई : कल्याण पूर्वतील रहिवाश्यांनी केले प्रशासनाचे श्राध्द घालून मुंडन (व्हिडीओ)

Residents of Kalyan East are agitating because of the uncomplete road work
Residents of Kalyan East are agitating because of the uncomplete road work

कल्याण : कल्याण पूर्व मधील एका वसाहतीच्या रखडलेल्या रस्त्याचे काम सुरू करा अशी मागणी करून ही पालिकेने लक्ष्य न दिल्याने कल्याण पूर्व मधील पालिकेच्या 'ड' प्रभाग क्षेत्र कार्यालय समोर आज मंगळवार ता 21 मे पासून स्थानिक नागरिक आणि आप आदमी पार्टीच्या पदाधिकारी वर्गाने साखळी उपोषण सुरू केले असून पालिका प्रशासनाने दखल न घेतल्याने उपोषणाच्या आठव्या दिवशी नागरिकांनी आज मंगळवार ता 28 मे  ला नागरिकांनी मुंडून करून आपला निषेध व्यक्त केला.

मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण पूर्वतील काटेमानवली भागातील जाई बाई शाळा रोड येथील मातृ छाया कॉलनीमध्ये चार चाळी असून तेथे एकूण 40 घरे असून शेकडो नागरीक वर्षांनुवर्षे राहत आहेत. या कॉलनीच्या आजूबाजूला वस्ती वाढल्याने, इमारतीचे बांधकाम झाल्याने या कॉलनीतील नागरिकांचा मुख्य रस्त्यावर येण्याचा मार्ग कायमस्वरूपी बंद झाला आहे. आजारी रुग्णाला नेण्यासाठी रुग्णवाहिका वा आग लागल्यास अग्निशामक दलाची गाडी येण्यासाठी मार्गच उरलेला नाही, लगतचे खाजगी मालक त्याचा जागेतून ये-जा करण्यास मज्जाव करीत आहे. त्यामुळे मातृछाया कॉलनीतील नागरिकांनी येथील गटार झाकून त्यावरून मुख्य रस्त्यापर्यंत पोहोच मार्ग बांधून देण्याची मागणी महापालिकेकडे केली होती.

त्यानुसार महापालिकेने तेथील गटारावर रस्ता बांधून पोहच मार्ग बनविण्याचे काम ता. 28 मार्च 2019 ला सुरू केले. मात्र अचानक दुसऱ्या दिवशी हे काम थांबविण्यात आले. तरी या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन आम आदमी पक्षाचे कल्याणचे लोकसभा अध्यक्ष ऍड. धनंजय जोगदंड साहेब, रवी केदारे, राजू पाडये, राजेश शेलार, उमेश कांबळे तसेच स्थनिक चाळकरी यांनी दि 6 मे 2019 ला आयुक्तांची भेट घेतली. त्याप्रमाणे आयुक्तांनी कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग अधिकारी रघुवीर शेळके यांना सदर काम पूर्ण करण्याचे आदेश दिले.

तरीही सदरचे काम पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा करूनही त्याला महापालिका दाद लागून देत नसल्याने आज मंगळवार ता. 21 मे ला कल्याण पूर्व मधील पालिकेच्या 'ड' प्रभाग कार्यालयासमोर रहिवासी गौतम कांबळे, मुकूंद कांबळे, मनोज शेट्टी, गौतम डी कांबळे, संतोष गायकवाड, योगेश स्पतिस्कर, अजित कर्पे, पी न पाडे, रहिवासी महिला तसेच आम आदमी पक्षाचे ऍड. धनंजय जोगदंड, रवि केदारे, राजू पाडे, उमेश कांबळे आणि कार्यकर्ते आदींनी साखळी उपोषण सुरू केले होते. उपोषणकर्ते मनोज शेट्टी आणि काही महिलांना चक्कर आल्याने त्यांना रुग्णालयात दाखल केले होते. पालिका प्रशासनाने सात दिवस झाले तरी दखल न घेतल्याने आज मंगळवार ता. 28 मे ला गौतम कांबळे, अजित कर्पे, मुकुंद कांबळे, गणेश खाकम आदींनी मुंडन करून पालिका प्रशासनाचे विधिवत श्राद्ध घालून आपला निषेध व्यक्त केला.

आज सायंकाळपर्यंत कोणी दखल न घेतल्यास आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा दिला. यावेळी आंदोलनाची दखल घेत शिवसेना नगरसेवक निलेश शिंदे, शीतल मंढारी, हर्षवर्धन पालांडे, प्रशांत काळे आदींनी उपोषण कार्यकर्त्यांची भेट घेत समस्या दूर करण्याचे आश्वासन दिले.

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com