
Water Supply
कळवा : कळवा परिसरात गेल्या तीन महिन्यांपासून महापालिकेकडून पाणीपुरवठा अनियमित होत असल्याने बुधवारी (ता. २४) संतापाचा भडका उडाला. भाजप आमदार संजय केळकर यांच्या नेतृत्वाखाली कळवावासीयांनी प्रभाग समिती कार्यालयावर हंडा मोर्चा काढून प्रशासनाला जाब विचारला. प्रभाग समिती कार्यालयाबाहेर मडके फोडून या वेळी घोषणाबाजी केली. विशेष म्हणजे राज्यात सत्तेवर असलेल्या आणि पालिकेचे प्रशासन ताब्यात असलेल्या पक्षांनीच हा मोर्चा काढल्याने निदान आतातरी हंड्यात पाणी येईल, अशी अपेक्षा कळवावासी करत आहेत.