जंगलच्या राजाने फोडली डरकाळी...

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 जानेवारी 2020

पालघरमधील आदिवासी महासंमेलनात हक्कांसाठी संघर्ष तीव्र करण्याचा ठराव

पालघर ः पालघर येथे गेले तीन दिवस झालेल्या आदिवासी एकता सांस्कृतिक महासंमेलनात जंगलचा राजा म्हणून ओळख असणाऱ्या आदिवासींचे जीवन, त्यांच्या संस्कृतीवर होणारे हल्ले आणि पालघर जिल्ह्यातील विनाशकारी प्रकल्पाला विरोध करण्यात आला. तसेच भूमी सेना, आदिवासी एकता परिषदेतर्फे याबाबत सुरू असलेला संघर्ष अधिक तीव्र करण्याचा ठराव संमेलनाच्या सांगता कार्यक्रमात संमत करण्यात आला.

दाऊदला तुडवणारा करीम लाला होता तरी कोण..

आदिवासी एकता सांस्कृतिक महासंमेलनात तीन दिवस विविध विषयांवर चर्चा करण्यात येऊन यासंदर्भात १३ ठराव मांडून ते मंजूर करण्यात आले. विनाशकारी प्रकल्पाची उभारणी करताना संविधानाचे, आंतरराष्ट्रीय नियमाचे उल्लंघन सरकारी यंत्रणेतर्फे केले जात असल्याने त्याचा तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला.

प्रदूषणाने बेजार, पाताळगंगा नदीची व्यथा

पालघर जिल्ह्यातील विनाशकारी प्रकल्प, या विषयावर चर्चा करताना दिल्ली-मुंबई दरम्यान उभारण्यात येणाऱ्या द्रुतगती मालवाहू रेल्वे मार्गामुळे आदिवासींना विनाशाकडे ढकलले जात असल्याचे मत या वेळी मांडण्यात आले. 

त्याचबरोबर मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन, मुंबई-वडोदरा द्रुतगती मार्ग वाढवण आणि नारगोल येथे उभारण्यात येणारी बंदरे, एमएसआरडी क्षेत्राचा पालघर तालुक्‍यापर्यंत झालेल्या विस्तारामुळे जिल्ह्याच्या विकासाच्या नावावर विनाशकारी प्रकल्प लादले जात आहेत.  यामुळे आदिवासी, मच्छीमार, शेतकरी आणि भूमिपुत्र बाधित होणार आहेत. या प्रकल्पालाही या संमेलनात विरोध करण्यात येऊन या प्रकल्पाविरोधात तीव्र आंदोलन करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. या संमेलनात तीन दिवस विविध राज्यांतील आदिवासींचे सांस्कृतिक कार्यक्रमही उत्साहात झाले. 
 

संमेलनातील महत्त्वाचे ठराव 

  •      पेसा कायद्याची अंमलबजावणी काटेकोरपोणे करावी. 
  •      पाणी आणि जंगल जमीन यावर आदिवासींचा हक्क अबाधित ठेवावा.
  •      आदिवासींच्या जागेवर अतिक्रमण होोणार नाही, याची दक्षता सरकारने घ्यावी.
  •      प्रत्येक जिल्ह्यात आदिवासी संस्कृती भवनाची निर्मिती करावी.  
  •      आदिवासी भाषा, कला, संस्कृती आणि तत्त्वांचे रक्षण संवर्धन करावे.
  •      आदिवासी जीवनशैलीचे दर्शन घडवणारे संग्रहालय, प्रशिक्षण केंद्र, वाचनालय उभारावे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Resolution to intensify the rights, struggle of aadivasi at the Palghar