मस्जिद बंदर बाजार कड़कड़ीत बंद

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 जुलै 2018

मुंबादेवी : मराठा समाजाने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदचा सर्वात मोठा परिणाम मस्जिद बंदर येथील मोठा बाजार, धान्य तसेच किराणा बाजार पेठ, गोडावून लोडिंग अनलोडिंग वर्क येथे दिसला. या भागात 100 टक्के बंद असून, माथाड़ी कामगार नेते पोपटराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली जवळपास 250 माथाडी आणि स्थानिक मराठा युवक यांनी एकत्र येत मोर्चा काढत सरकार विरोधी रोष व्यक्त केला. 

एक मराठा, लाख मराठा. मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे अशा गगनभेदी घोषणा देण्यात आल्या. माथाड़ी चौकात पाटील यांनी चौकसभा घेत मराठा समाजाच्या सहन शीलतेचा अंत पाहू नका. जो वर आम्ही शांत आहोत तो वर ठीक आहे. मराठा पेटला तर सरकार जळून खाक झाल्या शिवाय राहणार नाही. आमची ताकत सरकार जाणून आहे. आम्ही राज्यात लाखांलाखांचे 56 मोर्चे शांततेत पार पडले आहेत. जर आम्ही उग्ररूप धारण केले तर सरकारच्या बापालाही आवरणे  कठीण होईल. आमच्या मुलांना नोकारीत आरक्षण मिळालेच पाहिजे. 

दरम्यान, पोलिस उपायुक्त ज्ञानेश्वर चव्हाण यांनी जातीने उपस्थित राहत  चोख पोलिस बंदोबस्त ठेवला. तसेच त्यांनी संतप्त घोषणा देणाऱ्या तरुणांना शांत करीत मोर्चा स्थगित करण्याची विनंती करीत चिघळणारी परिस्थिती योग्य प्रकारे हाताळली आणि मराठा मोर्चाचे रूपांतर शांती मोर्चात झाले. शेवटी माथाडी चौकात दिवंगत काकासाहेब शिंदे यांना श्रद्धांजली देण्यात आली.

Web Title: response to maharashtra band in masjid bandar