esakal | उत्सवावर निर्बंध; ठाणे पोलिस सज्ज
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

उत्सवावर निर्बंध; ठाणे पोलिस सज्ज

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

ठाणे : कोरोनाच्या (Corona) संभाव्य तिसऱ्या लाटेपासून बचाव करण्यासाठी गणेशोत्सवाप्रमाणेच नवरात्रोत्सवामध्येदेखील (Navratri) सरकारने निर्बंध घातले आहेत. याच पार्श्वभूमीवर ठाणे पोलिस (Police) सतर्क झाले असून नवरात्रीमध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. ठाणे (Thane) पालिका आणि राज्य सरकारने नियमावली प्रसिद्ध केली आहे.

जी मंडळे आणि कार्यकर्ते या नियमाने पालन करणार नाहीत, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलिसांची गस्त वाढवण्यात येणार आहे. गेल्या आठवड्यात ठाण्यातील वेगवेगळ्या ठिकाणांहून पान शॉप, हुक्का पार्लर आदी ठिकाणी अमलो पदार्थविरोधी पथकाने छापा टाकून लाखो रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले होते. नवरात्र उत्सवामध्येही अमली पदार्थांची मोठ्या प्रमाणात खरेदी विक्री होत असते. या सर्वांचा विचार करता अमली पदार्थ तस्करी, खरेदी विक्री याकडेही ठाणे पोलिसांचे लक्ष असणार आहे.

हेही वाचा: "हा निर्णय अनपेक्षित, अनाकलनीय आणि निराश करणारा"

कोणत्याही अनपेक्षित घटना घडू नये यासाठी नाकाबंदी, संशयास्पद व्यक्ती, निर्जन ठिकाणे यांची झाडाझडती घेतली जाणार आहेत. ठाण्यातील विविध भागांत दांडियाचे आयोजन केले जाते. त्यात नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते. गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी निर्बंध थोड्या प्रमाणात शिथिल | असल्याने अनेक हॉलमध्ये अथवा इमारत परिसरात गरबा आयोजित केला जाऊ शकतो. त्यामुळे अशा ठिकाणी पोलिसांची करडी नजर असणार आहे.

हेही वाचा: अकोला : राष्ट्रीय महामार्गावर बस लुटणारा पोलिस कर्मचारी बडतर्फ

पोलिस बंदोबस्त

८ पोलिस उपायुक्त

• ११ सह पोलिस उपयुक्त

• १०६ पोलिस निरीक्षक

• २४४ सहायक पोलिस निरीक्षक/ २२ महिला अधिकारी

• २७६७ पोलिस अंमलदार ४८९ महिला पोलिस अमलदार • महाराष्ट्र राज्य राखीव पोलिस दल

४ तुकड्या

• ५०० होमगार्ड

loading image
go to top