दहावी बारावीच्या निकालाची तारिख ठरली? या तारखेपर्यंत होणार जाहीर; वाचा

सकाळ वृत्तसेवा 
Tuesday, 23 June 2020

  • राज्य मंडळाच्या बारावीचा निकाल 15 जुलैपर्यंत तर दहावीचा निकाल जुलैअखेरीस लागण्याची शक्यता आहे. 
  • महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण बोर्डाच्या अध्यक्षा शकुंतला काळे यांची माहिती. 

 

मुंबई- कोरोना व्हायरसचं संकट पाहता देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. लॉकडाऊनचा परिणार शिक्षण व्यवस्थेवरही झाला आहे. लॉकडाऊन जाहीर करण्यापूर्वी बारावीचे सर्व पेपर्स होते. मात्र दहावीचा केवळ भूगोलाचा पेपर रद्द करण्यात आला. यंदा मार्चच्या दहावी परीक्षेसाठी 17 लाख 65 हजार 898 आणि बारावीसाठी 15 लाख 5 हजार 27 विद्यार्थी बसलेत. अशातच राज्य मंडळाच्या बारावीचा निकाल 15 जुलैपर्यंत तर दहावीचा निकाल जुलैअखेरीस लागण्याची शक्यता आहे. अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण बोर्डाच्या अध्यक्षा शकुंतला काळे यांनी दिली. 

मुंबईतील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शालेय शिक्षणमंत्री वर्षां गायकवाड यांच्यासह शिक्षण विभागाची व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक पार पडली. त्यावेळी त्या बोलत होत्या. या बैठकीत ऑनलाईन शिक्षण, दहावी, बारावीचे निकाल, अकरावीची प्रवेश प्रक्रिया अशा विविध मुद्दय़ांवर चर्चा करण्यात आली. दहावी आणि बारावी निकालाच्या प्रक्रियेचा ठाकरे यांनी आढावा घेतला. 97 टक्के उत्तरपत्रिका या कोरोना काळात परीक्षकांकडून जमा करण्यात आल्या असून स्कॅनिंग ही वेगाने सुरु आहे, अशी माहितीही शकुंतला काळे यांनी बैठकीत दिली.

शालेय शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतर विविध ऑनलाईन माध्यमांचे पायलट प्रॉजेक्ट सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले होते. त्याप्रमाणे सोमवारी त्यांनी जिओ टीव्ही, तसेच गुगल मीटद्वारे कशाप्रकारे ऑनलाईन वर्ग भरवता येतो, त्याचे प्रात्यक्षिक पाहिले आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधला. 

विद्यार्थ्यांसाठी जिओ टीव्हीवर दोन वाहिन्या 

जिओ टीव्हीवर प्रायोगिक तत्त्वावर दहावी आणि बारावीसाठी दोन वाहिन्या तयार करण्यात आल्यात. गुगल मीट प्रणालीच्या माध्यमातून ऑनलाईन वर्ग भरवण्यात येणारेत. तसेच या टीव्हीवर पहिली ते बारावी असे स्वतंत्र पाच वाहिन्यांचेही नियोजन आहे, असे सांगण्यात आले. दूरदर्शनकडे देखील दिवसाला 4 ते 5 तास शैक्षणिक तास आयोजित करण्याचे नियोजन आहे, असे यावेळी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले.

राज्यात 103 कोरोना चाचणी प्रयोगशाळा, चाचण्यांची संख्या वाढणार

अकरावी प्रवेश प्रक्रियेची पुढच्या महिन्यापासून 

दहावीच्या निकालानंतर सुमारे दीड महिना अकरावीची प्रवेश प्रक्रिया चालेल. या वर्षापासून ऑनलाईन पोर्टलमध्येही आवश्यक ते बदल करण्यात येत आहेत. विद्यार्थ्यांना ऑनलाईन शुल्क भरणे, डिजिटल पुस्तिका, मोबाईल अॅप अशा सुविधा देण्यात येत आहेत.1 जुलैपासून महाविद्यालयांचे नोंदणी सत्र सुरु होईल, अशी माहिती यावेळी विभागाने दिली.  

मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, अमरावती, नाशिक या विभागांमध्ये ही प्रक्रिया ऑनलाईन चालणार असून, इतरत्र आणि ग्रामीण भागांत ऑफलाईन प्रक्रिया चालेल. या प्रक्रिया व्यवस्थित चालतील, असे पाहण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The result of the 10th and 12th results will be announced by this date; Read on

टॉपिकस