राज्यात 103 कोरोना चाचणी प्रयोगशाळा, चाचण्यांची संख्या वाढणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

corona test

राज्यात 9 मार्चला कोरोनाचा पाहिला रुग्ण आढळला, त्या वेळी मुंबई आणि पुणे या दोन ठिकाणीच चाचण्यांची सुविधा होती.

राज्यात 103 कोरोना चाचणी प्रयोगशाळा, चाचण्यांची संख्या वाढणार

मुंबई : राज्यात कोरोना चाचणी प्रयोगशाळांची संख्या 103 झाली असून, त्यामध्ये 60 सरकारी आणि 43 खासगी प्रयोगशाळा आहेत. 26 मे ते 20 जून या कालावधीत नव्या 30 प्रयोगशाळा सुरू झाल्या आणि प्रति दशलक्ष चाचण्यांची संख्या दुप्पट वाढली आहे.

मोठी बातमी : धनंजय मुंडे यांना झालेल्या कोरोनाबद्दल मोठी अपडेट, डॉक्टर म्हणालेत...

राज्यात 9 मार्चला कोरोनाचा पाहिला रुग्ण आढळला, त्या वेळी मुंबई आणि पुणे या दोन ठिकाणीच चाचण्यांची सुविधा होती. त्यानंतर कोरोना चाचणी सुविधेत राज्य सरकारने वाढ केल्यामुळे प्रयोगशाळांची संख्या 103 वर गेली आहे. राज्याचे प्रति दशलक्ष प्रयोगशाळा नमुन्यांचे प्रमाण 5847 असून, देशपातळीवरील हे प्रमाण 4610 आहे.

हे ही वाचा : अमित ठाकरेंचं उपमुख्यमंत्र्यांना पत्र, पत्रात केली 'ही' मागणी

देशात सर्वाधिक कोरोना चाचण्या महाराष्ट्रात होतात. गेल्या तीन महिन्यांत चाचण्यांची क्षमता वाढवण्यासाठी प्रयत्न करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबईतील जी. टी. हॉस्पिटल येथील प्रयोगशाळांचे उद्घाटन गेल्या आठवड्यात झाले. रविवारपर्यंत सात लाख 73 हजार 865 नमुने पाठवण्यात आले असून, त्यापैकी एक लाख 32 हजार 75 नमुने पॉझिटिव्ह आले; हे प्रमाण 17 टक्के आहे.

महत्वाची बातमी : ठाकरे सरकारकडून चीनला धक्का, 'ते' तीन करार केले रद्द

वाढत्या सुविधा

दिनांक      प्रयोगशाळा      प्रति दशलक्ष चाचण्या
26 मे           73                  3347 
29 मे           77                  3387 
5 जून           83                  4086 
12 जून         95                  4861 
21 जून        103                 5847 

नक्की वाचा : कोरोनावर आलेल्या १०३ रुपयांच्या 'फॅबि-फ्लू' या गोळीबद्दल महत्त्वपूर्ण माहिती...

प्रयोगशाळांची संख्या 
मुंबई - 27 (सरकारी 12, खासगी 15), ठाणे - 7 (सरकारी 2, खासगी 5), नवी मुंबई - 3 (सरकारी 1, खासगी 2), पुणे - 22, (सरकारी 10, खासगी 12), नागपूर – 11 (सरकारी 7, खासगी 4), कोल्हापूर - 3 (सरकारी 2, खासगी 1), नाशिक - 4 (सरकारी 2, खासगी 2), सातारा - 2 (सरकारी 1, खासगी 1), नगर - 2 (सरकारी 1, खासगी 1), पालघर (डहाणू) - 1, रत्नागिरी -1, सिंधुदुर्ग - 1, सांगली (मिरज) - 1, सोलापूर - 2, धुळे - 1, जळगाव - 1, अकोला - 1, अमरावती - 2, यवतमाळ - 1, गडचिरोली - 1, चंद्रपूर -1, गोंदिया - 1, वर्धा - 1, औरंगाबाद - 1, नांदेड - 2, बीड - 1, लातूर - 1, परभणी - 1.

103 corona test laboratories in the state, the number of tests will increase

Web Title: 103 Corona Test Laboratories State Number Tests Will Increase

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top