

Mumbai Schools Results announced
ESakal
मुंबई : राज्य मंडळाच्या सर्व प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये शैक्षणिक वर्ष २०२५-२६ चा निकाल १ मे रोजी पहिली ते नववीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांचे जाहीर करण्याच्या सूचना दिलेल्या असताना मुंबईतील अनेक शाळांना या निकालाची घाई करत २९ मे रोजीच आपल्या शाळांतील निकाल जाहीर करून त्यासाठीच्या गुणपत्रिकांचे वाटप सुरू केले आहे. यामुळे उन्हाळी सुट्टयांचा अगोदरच लाभ घेण्यासाठी शाळांनी सुरू केलेल्या या खटाटोपावर आश्चर्य व्यक्त केले जात आहे.