esakal | भिंतीवर सुसाईड नोट लिहून सेवानिवृत्त शिक्षकाची आत्महत्या 
sakal

बोलून बातमी शोधा

भिंतीवर सुसाईड नोट लिहून सेवानिवृत्त शिक्षकाची आत्महत्या 

कारण वाचून व्हाल हैराण

भिंतीवर सुसाईड नोट लिहून सेवानिवृत्त शिक्षकाची आत्महत्या 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

ठाणे ः भिंतीवर सुसाईड नोट लिहून ठाण्यातील एका सेवानिवृत्त शिक्षकाने घरातील पंख्याला गळफास लावून आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. चंद्रभान चौबे (70) असे निवृत्त शिक्षकाचे नाव आहे. मालमत्ता नावावर करून देण्यासाठी सुनेच्या माहेरकडील मंडळींकडून होणाऱ्या जाचाला कंटाळून त्यांनी हे पाऊल उचलल्याचे आत्महत्येपूर्वी भिंतीवर आणि चिठ्ठीत लिहिले आहे. ही घटना मागील मंगळवारी (ता. 11) घडली असून याप्रकरणी वर्तकनगर पोलिस ठाण्यात सून करुणा व माहेरच्या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

हेही वाचा - विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी

चौबे हे आपल्या पत्नी, मुलगा निरज (38) आणि त्याची पत्नी करुणा व दोन नातवंडांसह सावरकर नगरच्या भोलेनाथ सोसायटीत वास्तव्यास होते. शिक्षकी पेशातून सेवानिवृत्त झाल्यानंतर सून करुणा हिने मालमत्ता नावावर करण्यासाठी सासरे चौबे यांच्यामागे तगादा लावला होता. त्याला उत्तर प्रदेश येथील सून करुणा हिच्या माहेरच्या मंडळींची फूस होती. सुरुवातीला चौबे यांनी याकडे दुर्लक्ष केले. तरीही 10 फेब्रुवारी रोजी सून करुणा हिचे वडील उमेश त्रिपाठी आणि भाऊ मनोज त्रिपाठी यांच्यासह अन्य अनोळखी मंडळी उत्तर प्रदेशातून ठाण्यात येऊन जबरदस्ती करू लागले.

महत्त्वाची बातमी - आरक्षणात रखडली म्हाडाची सोडत

या त्रासाला कंटाळून 11 फेब्रुवारी रोजी सकाळच्या सुमारास सर्व जण घराबाहेर गेल्यावर चंद्रभान चौबे यांनी स्केचपेनने आपल्या डायरीत, घराच्या हॉलमधील भिंतीवर आणि बाथरूमच्या भिंतीवर माझ्या मृत्यूला सून करुणा, तिचे वडील उमेश त्रिपाठी, भाऊ मनोज त्रिपाठी जबाबदार असल्याचे लिहिले आणि धोतराच्या साह्याने पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली. दरम्यान, गुन्हा दाखल झालेली सून करुणा, महेश त्रिपाठी व मनोज त्रिपाठी हे उत्तर प्रदेशात राहणारे असल्याने अद्याप कुणालाही अटक केलेली नाही. 

web title : Retired teacher committed suicide by writing a suicide note on the wall