N 95 मास्कचा पुन्हा वापर करणं शक्य आहे का ? संशोधनातून माहिती झाली उघड 

N 95 मास्कचा पुन्हा वापर करणं शक्य आहे का ? संशोधनातून माहिती झाली उघड 

मुंबई : एन 95 मास्कचा आता आपण पुनर्वापर करणे शक्य होणार आहे. N95 मास्कला संक्रमणमुक्त म्हणजेच डिसइन्फेक्ट करण्याची नवी पद्धत शोधून काढण्यात शास्त्रज्ञांना यश आले आहे. हीट आणि ह्युमिडीटी म्हणजेच उष्ण आणि आर्द्रतेचा संयोग करून एन 95 मास्क आता संक्रमण मुक्त करू शकतो.

एसएलएसी म्हणजेच नॅशनल एक्सीलिरेटर लॅबोरेटरी, स्टैनफोर्ड यूनिवर्सिटी आणि यूनिवर्सिटी ऑफ टेक्सासच्या चिकित्सा शाखेतील संशोधकांनी हा शोध लावला असून त्यात उच्च रिलेटिव ह्यूमिडिटी मध्ये एन95 मास्क ला हळूहळू गरम केल्याने त्यातील गुणवत्तेत काहीही परिणाम न होता मास्क च्या आतील SARS-CoV-2 विषाणुला निष्क्रिय होत असल्याचे स्पष्ट झाले.

संशोधकांपैकी वरिष्ठ संशोधक 'स्टिवन चू' यांनी सांगितले की, कोरोना संक्रमण काळात मास्क वापरणे मोठी समस्या बनली आहे. एक डझन पेक्षा अधिक मास्क प्रत्येकाला वापराव लागत असल्याने मास्कचा साठा जमवावा लागतो. खास करून डॉक्टर आणि नर्ससाठी मोठी समस्या उभी राहिली आहे. मात्र या नव्या संशोधनामुळे यावर तोडगा निघाला असून आता केवळ कॉफी ब्रेक मध्ये देखील ते आपल्या मास्कचं निर्जंतूकीकरण करू शकतात.

शोधातील निष्कर्ष 
या नव्या संशोधनात यूनिवर्सिटी ऑफ टेक्सास मधील चिकित्सा शाखेचे विषाणु विज्ञान तज्ञ स्कॉट वीवर आणि स्टैनफोर्ड/एसएलएसी चे प्रोफेसर यी कुई तसेच वाह चिउ यांनी मास्कला संक्रमण-मुक्त करण्यासाठी हीट एंड ह्यूमिडिटी च्या प्रयोगावर आपलं लक्ष केंद्रीत केलं.

प्रयोगासाठी आणलेले नमूने रिलेटिव ह्यूमिडिटी सह 25 से 95 डिग्री सेल्सियस तापमान मध्ये 30 मिनिट गरम केले. 25 सप्टेंबररोजी एसीएस नॅनो पत्रिकेमध्ये या संशोधनातील निष्कर्ष प्रकाशित करण्यात आले.

20 वेळा करू शकतो वापर
अधिक आर्द्रता तसेच उष्णतेमुळे मास्कवरील विषाणूंची संख्या कमी झाली आहे. मात्र अधिक तापमानात मास्क जळण्याची भिती देखील होती. मास्कवरील विषाणूला मारण्याच्या प्रयत्नात मास्कसाठी वापरण्यात आलेल्या पदर्थाची क्षमता प्रभावित होण्याची शक्यता होती.

मास्कसाठी 85 डिग्री सेल्सियस हे योग्य तापमान होते​, ज्यात रिलेटिव ह्यूमिडीटी 100 टक्के होती. या तापमानात मास्क ठेवल्यानंतर संशोधकांना मास्कवर कोविड चे विषाणू दिसले नाहीत. इतकेच नाही तर मास्कला किमान 20 वेळा वापरण्या योग्य बनवू शकतो हे ही स्पष्ट झाले. याशिवाय कोरोना सह  ताप तसेच चिकनगुनियासाठी कारणीभूत असणा-या विषाणूंना देखील अशा प्रकारे नष्ट करू शकतो.

reuse of n 95 mask is possible research done by stanford university

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com