esakal | NCB ने तपास CBI कडे सुपुर्द करायला हवा; NCB ला तपासाचा अधिकार नाही; सतीश मानेशिंदेंचा युक्तिवाद
sakal

बोलून बातमी शोधा

NCB ने तपास CBI कडे सुपुर्द करायला हवा; NCB ला तपासाचा अधिकार नाही; सतीश मानेशिंदेंचा युक्तिवाद

रिया आणि तिचा भाऊ शौविकच्या जामीन अर्जावर आज न्या. सारंग कोतवाल यांच्यापुढे सुनावणी झाली.

NCB ने तपास CBI कडे सुपुर्द करायला हवा; NCB ला तपासाचा अधिकार नाही; सतीश मानेशिंदेंचा युक्तिवाद

sakal_logo
By
सुनीता महामुणकर

मुंबई, ता. 24 : अमलीपदार्थ प्रकरणात अटक करण्यात आलेल्या अभिनेत्री रिया चक्रवर्तीच्या वतीने आज एनसीबी करीत असलेल्या तपासाला मुंबई उच्च न्यायालयात विरोध करण्यात आला. रियाला हेतुपुरस्सर केन्द्रीय तपास यंत्रणा लक्ष्य करीत आहेत, असा आरोप करण्यात आला. यावर एनसीबीला खुलासा करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.

रिया आणि तिचा भाऊ शौविकच्या जामीन अर्जावर आज न्या. सारंग कोतवाल यांच्यापुढे सुनावणी झाली. सर्वोच्च न्यायालयाने अभिनेता सुशांतसिंह प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपविला आहे. मात्र तरीही अमलीपदार्थ प्रतिबंधक विभाग  ( एनसीबी ) तपास करीत आहे. एनसीबीने हा तपास सीबीआयकडे सुपुर्द करायला हवा, एनसीबीला याप्रकरणी तपासाचा अधिकार नाही, सीबीआय देखील एनडीपीएस कायद्यानुसार तपास करु शकते, असा युक्तिवाद रिया आणि शौविकच्या वतीने एड. सतीश मानेशिंदे यांनी केला.

महत्त्वाची बातमी : शरद पवारांची संपत्ती आहे तरी किती ? सगळी माहिती आहे या रिपोर्टमध्ये

सुशांतला ड्रगचे व्यसन होते आणि त्याच्यासाठी ड्रग घेतले होते, त्याचे कधीही सेवन केले नाही, असेही रियाच्या वतीने सांगण्यात आले. तो नेहमी त्याच्या जवळच्या व्यक्तींना ड्रगसाठी वापरायचा असेही रिया आणि शौविकच्या वतीने सांगण्यात आले. अन्य आरोपींजवळ अत्यल्प प्रमाणात अमली पदार्थ मिळाले आहेत. मात्र ते कायदेशीर दृष्टिकोनातून गुन्हा दाखल करण्यासाठी पुरेसे नाही, असा युक्तिवाद करण्यात आला.

न्यायालयाने एनसीबीला सोमवारपर्यंत या आरोपांबाबत खुलासा करण्याचे निर्देश दिले. यावर पुढील सुनावणी पुढील मंगळवारी म्हणजे 29 सप्टेंबररोजी होणार आहे. अन्य तीन आरोपींनीही जामीनासाठी अर्ज केला आहे.

rhea chakrabortys satish mane shinde NCB CBI court arguments details