पालघरमध्ये पावसाने भातशेतात पाणी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 9 नोव्हेंबर 2019

पालघरमध्ये गुरुवारी (ता.७) रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण भातपिकाचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी म्हणून पंचनामे सुरू असले, तरी भरपाई कधी मिळणार असा प्रश्‍न शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.

पालघर ः पालघरमध्ये गुरुवारी (ता.७) रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण भातपिकाचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी म्हणून पंचनामे सुरू असले, तरी भरपाई कधी मिळणार असा प्रश्‍न शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.

जिल्ह्याच्या पश्‍चिम किनारपट्टीत ७ नोव्हेंबर ते ८ नोव्हेंबरदरम्यान महाचक्रीवादळाचा तडाखा बसेल व अतिवृष्टी होईल, असा इशारा दिला होता. प्रशासनानेही आपत्कालीन व्यवस्था उभारली होती; मात्र वादळाची तीव्रता कमी होऊन वादळी वाऱ्याचा तडाखा बसला नसल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्‍वास सोडला असतानाच काल रात्रभर पालघर तालुक्‍यात मुसळधार पाऊस पडल्याने पुन्हा शेतात पाणी साचले.

आजही पालघरमध्ये ढगाळ वातावरण होते. पालघर तालुक्‍यात १४ हजार ६८५ हेक्‍टर भाताची लागवड झाली असून एकूण १५ हजार ४१३ शेतकरी संख्या आहे. आतापर्यंत नऊ हजार ५९ नुकसानीचे पंचनामे झाले असल्याचे कृषी विभागातर्फे सांगण्यात आले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rice loss due to rainfall in Palghar