रिक्षाचालकानेच बुजविले रस्त्यावरील खड्डे

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 मे 2017

डोंबिवली - कल्याण-डोंबिवली महापालिकेला दोन वर्षांपूर्वी धडाडीचा आयुक्त मिळाल्याने नागरिकांनी किमान पुरेसे पाणी आणि खड्डेमुक्त शहराचे स्वप्न पाहण्यास सुरुवात केली होती; मात्र ही स्वप्ने अधुरीच राहिली आहेत. शहरात खड्ड्यांमध्ये डुबलेल्या रस्त्यांमुळे नागरिकांना प्रवास करताना त्रास सहन करावा लागत असतो. असाच एका रिक्षाचालकाला हृदयविकाराचा त्रास असल्यामुळे ‘स्वत: मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही’ या उक्तीचा प्रत्यय आला आहे. महापालिकेवर अवलंबून न राहता त्याने शेवटी स्वत:च जुनी डोंबिवलीतील खड्डे बुजवले.

डोंबिवली पश्‍चिमेकडील जुनी डोंबिवली येथील काही रस्त्यांवर पिण्याची पाईपलाईन टाकण्यासाठी खड्डे खणण्यात आले होते; मात्र हे खड्डे नीट बुजविण्यात न आल्याने रस्त्यावरून नेहमी ये-जा करणाऱ्या रिक्षाचालकांना व प्रवाशांना मणक्‍याच्या आजारांना सामोरे जावे लागत आहे. यातच दीपक मुळ्ये या रिक्षाचालकाला हृदयविकार असल्याने त्यांनाही मागील काही दिवसांपासून त्रास सुरू झाला होता. यामुळे काही दिवस महापालिका रस्त्यावरील खड्डे बुजवते का, याची वाट पाहिली; मात्र पालिका प्रशासन ढिम्म असल्याचे पाहून त्यांनी आपल्या रिक्षातून माती आणत खड्डे बुजविण्यास घेतले. मुळ्ये यांच्या कामाचा आदर्श घेत इतर रिक्षाचालकांनीही खड्डे बुजविण्यासाठी पुढाकार घेतला.

प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्यांना विचारला जाब
कल्याण-डोंबिवलीतील ‘ह’ विभागातील रिक्षाचालक अनंत परब, विलास पंडित, सुरेश पवार, शरद बालुलकर यांनी प्रभाग क्षेत्र अधिकारी शरद पाटील यांची भेट घेऊन जुनी डोंबिवलीतील खड्डे कधी बुजविणार, असा जाब विचारला. या वेळी पाटील यांनी आठ दिवसांत खड्डे बुजविणार असल्याचे आश्‍वासन दिले.

Web Title: Rickshaw puller on the road