esakal | ठाण्यात सराईत रिक्षाचोराला अटक
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

ठाण्यात सराईत रिक्षाचोराला अटक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

ठाणे : कासारवडवली पोलिस (Police) ठाण्यातून पोलिसांनी रिक्षांची (Auto) चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक (Arrest) केली. त्याच्याकडून चार ऑटोरिक्षा जप्त केल्या आहेत.

हेही वाचा: सातारा : पत्नीचा डोक्‍यात दगड घालून त्याच्याकडून खून

अजिंक्य अशोक मोदी ऊर्फ जावा (३०) याला दहिसर पोलिसांनी अटक केली. त्याचा ताबा कासारवडवली पोलिसांनी घेतला. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने चार रिक्षा चोरल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून दोन लाख ७० हजार किमतीच्या चार ऑटोरिक्षा हस्तगत केल्या. वरिष्ठ पोलिस निरीक्षक किशोर खैरनार अधिक तपास करीत आहेत.

loading image
go to top