
ठाणे : ठाणेकरांचा प्रवास सुखकर व्हावा, त्यांच्या वेळेची बचत व्हावी यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रयत्नांनी `ठाणे अंतर्गत रिंग रेल्वे मेट्रो'च्या (वर्तुळाकार मेट्रो) कामाला केंद्र आणि राज्य शासनाने मंजूरी दिली आहे. मेट्रो प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण व्हावा यासाठी ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र शासनाकडे पाठपुरावा करत आहेत.