माणगावातील दगडांत घंटेचा आवाज

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 ऑगस्ट 2019

मुंबई-गोवा महामार्गापासून कोलाड-इंदापूर रस्त्यावर निळज हे गाव आहे. त्याच्या माळरानावर दगडमाळ आहे. त्यामधील दोन दगड त्याच्या निनादामुळे वैशिष्ट्यपूर्ण ठरले आहेत. या दगडांवर दुसऱ्या दगडाने अथवा लोखंडी वस्तूने मारल्यास घंटेसारखा निनाद होतो. या "घंटेच्या दगडां'चे ग्रामस्थांना आश्‍चर्य वाटते. 

माणगाव : निसर्गाचा वरदहस्त लाभलेल्या माणगाव तालुक्‍यातील निळज गाव सध्या पर्यटकांबरोबरच अभ्यासकांचे लक्ष वेधत आहे. या गावातील माळरानावर असलेल्या अनेक दगडांपैकी दोन दगडांवर दुसरा दगड मारला; तर त्यामधून घंटेसारखा निनाद होत असल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे. 
मुंबई-गोवा महामार्गापासून कोलाड-इंदापूर रस्त्यावर निळज हे गाव आहे. त्याच्या माळरानावर दगडमाळ आहे. त्यामधील दोन दगड त्याच्या निनादामुळे वैशिष्ट्यपूर्ण ठरले आहेत. या दगडांवर दुसऱ्या दगडाने अथवा लोखंडी वस्तूने मारल्यास घंटेसारखा निनाद होतो. या "घंटेच्या दगडां'चे ग्रामस्थांना आश्‍चर्य वाटते. 

निळज गावातील घंटेसारख्या आवाजाच्या या दगडांविषयी अनेक पिढ्यांना माहिती आहे. पूर्वी या माळरानावर निनाद करणारे अनेक दगड होते. सध्या दोनच राहिले आहेत. देवळातील घंटे सारखा त्याचा प्रसन्न करणारा आवाज आहे. म्हणून त्याला माळरानाला घंटेचा माळ म्हणतात. 
- जनार्दन वाघमारे, ग्रामस्थ 

निळज गावातील माळरानावर असलेल्या दोन दगडांचा आवाज घंटेसारखा आहे. त्याचे संशोधन होणे आवश्‍यक आहे. त्यामध्ये धातूचे प्रमाण किती आहे, ही माहिती मिळणे आवश्‍यक आहे. 
- भरत काळे, भूगोल शिक्षक 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ringing rocks