साळाव येथे चेक नाक्‍याजवळ दरड कोसळली

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 4 ऑगस्ट 2019

मुंबई : मुरुड - जंजिरा तालुक्‍यातील साळाव येथे चेक नाक्‍याजवळ दरड कोसळल्याने साळाव - रोहा मार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली. जेसीबीद्वारे माती काढल्यानंतर येथील वाहतूकीचा मार्ग वाहनचालकांसाठी खुला करण्यात आला.

साळाव येथे चेक नाक्‍याजवळ दरड कोसळली 

मुंबई : मुरुड - जंजिरा तालुक्‍यातील साळाव येथे चेक नाक्‍याजवळ दरड कोसळल्याने साळाव - रोहा मार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली. जेसीबीद्वारे माती काढल्यानंतर येथील वाहतूकीचा मार्ग वाहनचालकांसाठी खुला करण्यात आला.

रामराज गावात पाणी शिरल्याने ग्रामस्थांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पावसाचा जोर कायम असल्याने येथील जनजीवन ठप्प झाले होते. चौल - रेवदंडामधील अनेक बागायतीत नारळ सुपारीचे वृक्ष उन्मळून पडल्याने बागायतदारांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. मुसळधार पावसामुळे गेले तीन दिवस येथील विजेचा पुरवठा खंडित करण्यात आला. अनेक ठिकाणी भातशेती पाण्याखाली गेल्याने भातलावण्याची कामेही ठप्प झाली. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Riot fell near a check point at Salave