पेणमध्‍ये पुरानंतर रोगराईचा धोका

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 ऑगस्ट 2019

मुंबई : मुसळधार पावसानंतर पेण तालुक्‍यात पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. आता पावसाने थोडी उसंत घेतली असल्याने पुराचे पाणी कमी झाले असले, तरी घरात साचलेला गाळ आणि चिखल उपसताना नागरिकांचे हाल झाले आहेत. शहरासह ग्रामीण भागात अस्वच्छता पसरली आहे. कुजलेले अन्नधान्य, मृत जनावरे यामधून नागरिकांचा वावर सुरू असल्याने रोगराईचे धोका वाढला आहे. तो दूर करण्याचे आव्हान आरोग्य यंत्रणेसमोर आहे.

तालुक्‍यात शुक्रवार, शनिवार आणि रविवारी मुसळधार पाऊस पडला. त्यामुळे हेटवणे धरण पूर्ण भरले. त्याच्या पाण्याच्या विसर्गामुळे भोगावती नदीकिनारी असलेल्या गावांना पुराचा फटका बसला. अंतोरे, नवघर, पाटणेश्वर, बळावली, खरोशी, दादर, रावे, हमरापूर, तांबडशेत, जोहे, वाढाव, कणे, बोर्झे, ओढंगी, गडब, आमटेम, कोलेटी या गावांना पुराचा अधिक फटका बसला. अंतोरे गावात पुराच्या पाण्यात अडकलेल्या ६५ जणांची सुटका करण्यासाठी लष्कर व एनडीआरएफची मदत घेण्यात आली. कणे गावात अडकलेल्या शंभर जणांनाही या जवानांनी सुखरूप बाहेर काढले. 

तालुक्‍यातील अनेक गावातील घरे पाण्याखाली होती. काही ठिकाणी पुराचे पाणी ओसरले आहे; तर कणे, ओढंगी गावात खोलगट भाग असल्यामुळे आणि ही गावे खाडीकिनारी असल्यामुळे पाणी ओसरण्यास वेळ जात आहे. घरात गुडघाभर चिखल, गाळ आहे. अन्नधान्यही कुजले असल्याने सर्वत्र अस्वच्छता पसरली आहे. जनावरांचे खाद्य, वाहनांचेही नुकसान झाले आहे. आता अस्वच्छतेमुळे लेप्टोस्पायरोसिससारख्या आजाराची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

पूरग्रस्त गावात तापाचा रुग्ण आढळला तर त्याच्यावर तातडीने उपचार करण्यात येतात. लेप्टोस्पायरोसिससारखे आजार पसरू नयेत म्हणून रुग्णांना डॉक्‍सीसाईक्‍लीन हे औषध दिले जाते. जिते आरोग्य केंद्राच्या अखत्यारीत असलेल्या गावांत डॉक्‍सीसाईक्‍लीन हे औषध प्रतिबंधात्मक म्हणून दिले जात आहे. अशुद्ध पाण्यापासून आजार होऊ नयेत म्हणून पाणी उकळून व गाळून पिण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर मोहीम सुरू करण्यात आली आहे.
- डॉ. मनीषा म्हात्रे, तालुका आरोग्य अधिकारी, पेण

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Risk of morbidity after exposure to pen