व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशपरिक्षेची अनिश्चितता; परिणामी अन्य पदवी अभ्यासक्रमांचा कट-ऑफ वाढणार?

व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशपरिक्षेची अनिश्चितता; परिणामी अन्य पदवी अभ्यासक्रमांचा कट-ऑफ वाढणार?

मुंबई : बारावीचे निकाल लागले आहेत, पण जेईई तसेच नीटच्या परिक्षा सप्टेंबरपर्यंत लांबणीवर पडल्या आहेत. त्याचवेळी पदवी अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. दरवर्षी बारावी आणि जेईई तसेच नीटचे निकाल एकाचवेळी लागतात, त्यामुळे या दोन्ही परिक्षांच्या निकालावर विद्यार्थी तसेच त्यांचे पालक प्रवेश घेतात. मात्र यावेळी पदवी अभ्यासक्रमांसाठी जास्त विद्यार्थी प्रवेश अर्ज भरण्याची शक्यता आहे. 

त्या पार्श्वभूमीवर प्रवेश परिक्षा लांबत असल्यामुळे बीए, बी कॉम, बी एससीसाठी यावेळी जास्त चुरस असेल, तसेच त्याचा कट-ऑफही उंचावला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जेईई तसेच नीटच्या परिक्षांना सामोरे जाणारे अनेक विद्यार्थी पर्याय म्हणून पदवी अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेण्याची शक्यता आहे. 

महाविद्यालयांची प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. जेईई तसेच नीटद्वारे प्रयत्न करणारे विद्यार्थी पर्याय म्हणून बीएससीसाठी प्रवेश अर्ज भरत आहेत, याकडे सायन्स परिवारचे विश्वस्त सुभाष जोशी यांनी लक्ष वेधले. त्याचवेळी त्यांनी प्रवेशाचा कटऑफ यंदा खूपच वाढलेलाही दिसण्याची शक्यता आहे. 

खालसा महाविद्यालयाचे प्राचार्य किरण माणगावकर यांना हे पूर्णपणे मान्य नाही. काही वर्षापासून इंजिनिअरिंगच्या तुलनेत बीएससी विद्यार्थ्यांना नोकरीच्या चांगली संधी उपलब्ध होत आहे. अर्थात व्यावसायिक अभ्यासक्रमास पसंती देणारे अनेक विद्यार्थी सुरुवातीस बीएससी किंवा बीएससी - आयटी साठी प्रवेश घेण्याची शक्यता आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळाल्यावर ते बीएससीसाठी घेतलेला प्रवेश रद्दही करु शकतील. 

विद्यार्थ्यांनी पर्यायांचा विचार करावाच लागेल असे सांगितले. जयहिंद महाविद्यालयातील संजना रामनाथ हिने कला शाखेच्या बारावी परिक्षेत 94.3 टक्के गुण मिळवले. तिला क्लॅटद्वारे विधीचा अभ्यास करायचा आहे. त्यासाठी नावाजलेल्या महाविद्यालयात शिकण्याची तिची इच्छा आहे. क्लॅटची परिक्षा कधी होणार हे काहीच सांगता येत नाही. ती परिक्षा सतत लांबणीवर पडत आहे. त्याचा प्रवेश परिक्षेतील गुणांवर परिणाम होईल, त्यामुळे ही परिक्षा पुढील वर्षीच दिलेली चांगली, असे तिने सांगितले.
---
संपादन : ऋषिराज तायडे
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com