

Ro-Ro Ferry Boat
ESakal
नितीन बिनेकर
मुंबई : कोकणवासीयांसाठी महत्त्वाची असलेली रो-रो फेरी सेवा पुन्हा एकदा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली गेली आहे. एका फेरीसाठी तब्बल १८ ते २० हजार लिटर डिझेल लागणार असून, त्यासाठी जवळपास २० लाख रुपयांचा खर्च येणार आहे. त्यामुळे तिकीटदर आणि इंधनखर्चाचा ताळमेळ बसत नसल्याने बोट ऑपरेटर कंपनीने सल्लागार नेमला आहे. सर्व आर्थिक बाबींचा अभ्यास करून पुढील वर्षी बोट सुरू करण्याचा प्रयत्न असल्याची माहिती सागरी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिली.