'आयएल अँड एफएस'कडून आता रस्ते प्रकल्पांची विक्री

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 डिसेंबर 2018

मुंबई - आर्थिक संकटात सापडलेल्या "आयएल अँड एफएस' कंपनीने निधी उभारणीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्याअंतर्गत आता समूहातील कंपनी असलेल्या आयएल अँड एफएस ट्रान्स्पोर्ट नेटवर्क लिमिटेडच्या मालकीचे रस्ते प्रकल्प आणि टोल वे, स्थावर मालमत्तांची विक्री केली जाणार आहे. यासाठी इच्छुकांकडून प्रस्ताव मागवण्यात आले आहेत.

देशातील 1 हजार 774 किमी लांबीचे रस्ते प्रकल्प, आठ टोल वे, निर्माणाधीन अवस्थेतील चार रस्ते प्रकल्पांची विक्री करण्याची तयारी कंपनीने सुरू केली आहे. याशिवाय तिरुअनंतपुरम येथील स्थावर मालमत्ता, स्पोर्टस कॉम्प्लेक्‍स आदींची विक्री केली जाणार असल्याचे "आयएल अँड एफएस"ने म्हटले आहे. यातून हजारो कोटींचा निधी उपलब्ध होईल, असा विश्‍वास कंपनीने व्यक्त केला आहे. निर्गुंतवणुकीचा पर्यायाची देखील चाचपणी केली जाणार आहे. दरम्यान, आयएल अँड एफएस समूहातील विविध कंपन्यांनी निधी उभारणीसाठी आलिशान मोटारी, फर्निचर तसेच इलेक्‍ट्रॉनिक उपकरणांच्या विक्रीसाठीही निविदा मागविल्या आहेत.

Web Title: Road Project Sailing by IL and FS