
Mumbai Traffic Route Change
ESakal
मुंबई : येत्या ८ सप्टेंबर रोजी मुंबईत ईद-ए-मिलादच्या मिरवणुका निघणार आहेत. त्यानुसार, मानखुर्द आणि घाटकोपर भागात मिरवणुकांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे. शेकडो गाड्या टू व्हीलर्स आणि ट्रक या मिरवणुकी असतील असा अंदाज आहे. वाहतूक पोलिसांनी नागरिकांना कुर्ला आणि विक्रोळी दरम्यानच्या एलबीएस मार्गावरुन प्रवास टाळण्याचा सल्ला दिला आहे. कायदा-सुव्यवस्था आणि सुरक्षितता राखण्यासाठी वाहन चालकांना मुंबई वाहतूक पोलिसांना सहकार्य करण्याच आवाहन करण्यात आलं आहे.