रेश्‍माच्या घराची त्याला होती माहिती; साथिदारांना बोलावून केले..

सकाळ वृत्तसेवा
Friday, 24 January 2020

तुर्भेत चोरी करण्यासाठी घुसलेल्या चौघांनी घरातील महिलेसह तीन मुलांवर चाकूने हल्ला केल्याची घटना बुधवारी (ता.22) सकाळी घडली. त्यानंतर पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोघा चोरट्यांना नागरिकांनी पकडून बेदम मारहाण करत, पोलिसांच्या स्वाधीन केले.

नवी मुंबई : तुर्भेत चोरी करण्यासाठी घुसलेल्या चौघांनी घरातील महिलेसह तीन मुलांवर चाकूने हल्ला केल्याची घटना बुधवारी (ता.22) सकाळी घडली. त्यानंतर पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोघा चोरट्यांना नागरिकांनी पकडून बेदम मारहाण करत, पोलिसांच्या स्वाधीन केले. मात्र, यातील दोघे जण त्या ठिकाणाहून पळ काढण्यात यशस्वी ठरले. 

ही बातमी वाचली का? अमित ठाकरेंबद्दल आजी कुंदा ठाकरे म्हणतात..

तक्रारदार रेश्‍मा अली मोहम्मद खान (46) या तुर्भे गाव सेक्‍टर-21 मध्ये कुटुंबासह राहण्यास असून, त्यांच्या घरात दोन ते अडीच लाखांची रक्कम होती. ही बाब रेश्‍माचा नातेवाईक असलेल्या आरोपी जिशान रिझवान खान (22) याला माहिती होती. त्यामुळे त्याने रेश्‍मा खान यांच्या घरामध्ये चोरी करण्याची योजना आखली. त्यासाठी उत्तर प्रदेश व दिल्ली येथून आपल्या तीन साथीदारांना बोलावून घेतले होते. त्यानुसार बुधवारी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास हे चोरटे तोंडाला रुमाल बांधून, रेश्‍माच्या घरात घुसले.

ही बातमी वाचली का? 'राज ठाकरे यांच्या हिंदुत्वामागे शरद पवार यांचं डोकं'
 
या वेळी आरोपी जिशान खान याने लग्नपत्रिका देण्याचा बहाणा करून, दरवाजाची कडी वाजवली. त्यामुळे रेश्‍माने दरवाजा उघडल्यानंतर या चौघांनी घरात घुसून चोरी करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे रेश्‍माने व तिच्या तीन मुलांनी त्यांना विरोध करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे या चोरट्यांनी त्यांच्या हातावर चाकूने वार केले. या वेळी झालेल्या झटापटीत रेश्‍मासह तिची तिन्ही मुले जखमी झाली असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार चालूआहेत. आरोपी झिशान व त्याचा साथीदार पळून जाण्यात यशस्वी झाले. मात्र, शहाबाज सादिकअली खान (20) आणि नाजीम डिफ्टी खान (21) या दोघांना नागरिकांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Robber in the turbhe four arrested navi mumbai