Rahul Raj Bus Hijack Case
Esakal
Rohit Arya Encounter Case Update: मुंबईत रोहित आर्या नावाच्या व्यक्तीने मुलांना कैद केल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी उडकीस आला होता. त्यानंतर पोलिसांनी या मुलांना त्याच्या कैदैतून सोडवण्याचा प्रयत्न केला. पण यावेळी झालेल्या चकमकीत रोहित आर्या मारल्या गेला. या घटनेनंतर आता विविध चर्चा सुरू झाल्या आहेत. महत्त्वाचं म्हणजे या घटनेनं अनेकांना १७ वर्षांपूर्वीच्या एका प्रकरणाची आठवण झाली आहे. १७ वर्षांपूर्वी राहुल राज नावाच्या व्यक्तीने अशाच प्रकारे बसमधील प्रवाशांना कैद करण्याचा प्रयत्न केला होता. विशेष म्हणजे तो राज ठाकरे यांना मारण्यासाठी मुंबईत आला होता. त्यासाठी त्याने प्रवाशांना कैद केलं होतं. रोहित आर्याप्रमाणे राहुल राजलाही पोलिसांनी ठार केलं होतं.