

Powai Children Hostage Reason
ESakal
मुंबईतील पवई परिसरातून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पवई परिसरातील आए स्टुडिओमध्ये एका व्यक्तीने काही मुलांना ओलीस ठेवले आहे. ही व्यक्ती मानसिकदृष्ट्या आजारी असल्याचे समजले आहे. सुमारे १७ मुलांना ओलीस ठेवले होते. घटनास्थळी पोलीस पोहोचले आहेत आणि त्यांनी एका व्यक्तीला अटक केली आहे. घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. मुलांना वाचवण्यासाठी विशेष मोहीम सुरू आहे. पोलिसांनी सांगितले आहे की, सर्व मुलांना सुरक्षितपणे वाचवण्यात आले आहे. यामागचे कारण आता समोर आले आहे.