उद्धव ठाकरेंचे नाव जाहीर करून, शरद पवारांनी खेळला मास्टरस्ट्रोक!

रोहित चंदावरकर
शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2019

मुंबईतील नेहरू सेंटर येथे काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना नेत्यांची सत्ता स्थापनेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीच्या पार्श्वभूमीवर बाहेर मुख्यमंत्रिपदाचीच सर्वाधिक चर्चा झाली एकूणच, या महाविकास आघाडीची वाटचाल काहींशी खडतर असल्याचे दिसत आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दृष्टीने आजचा शुक्रवार सर्वांत मोठ्या घडामोडींचा ठरला. गेल्या काही आठवड्यांपासून राज्यात शिवसेना आणि काँग्रेस-राष्ट्रवादी असे राजकीय समीकरण उदयाला येताना दिसत आहे. त्याला अंतिम स्वरूप येण्याच्या दिशेने महत्त्वाच्या घडामोडी झाल्या. मुंबईतील नेहरू सेंटर येथे काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना नेत्यांची सत्ता स्थापनेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीच्या पार्श्वभूमीवर बाहेर मुख्यमंत्रिपदाचीच सर्वाधिक चर्चा झाली एकूणच, या महाविकास आघाडीची वाटचाल काहींशी खडतर असल्याचे दिसत आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा, सकाळचे एप

शरद पवार यांची जबरदस्त खेळी
काल रात्री उशिरा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी दीर्घकाळ चर्चा केली. त्यानंतर आज शिवसेना आणि दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांमध्ये प्रदीर्घ चर्चा झाली. त्यावरून या आघाडीला सगळ्या गोष्टी सहज सोप्या नाहीत, हे स्पष्ट दिसत आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीला सत्ता स्थापनेची कोणतिही घाई नाही पण, त्यांना सत्तेत खूप मोठा वाटा आपल्याला मिळवून घ्यायचा असल्याचं दिसत आहे. या दोन्ही पक्षांनी विधानसभा अध्यक्षपदावर दावा केला असून, इतरही अनेक विषय या दोन पक्षांमध्ये चर्चेला आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांच्या नावावर सर्वपक्षीय सहसमती असल्याचे मीडियासमोर जाहीर करून, मास्टरस्ट्रोक खेळल्याचं मानलं जातंय. मुळात उद्धव ठाकरे यांना कोणत्याही सभागृहाच्या कामकाजाचा कसालाही अनुभव नाही. मंत्रालयात बसून फायलिंचा निपटारा करण्याचा अमुभव उद्धव ठाकरे यांना नाही. जर, या परिस्थितीतही उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपद स्वीकारलेच तर, सत्तेचा रिमोट कंट्रोल ठाकरे नव्हे तर, शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसकडे असणार आहे. जर, काँग्रेस-राष्ट्रवादीने उद्धव ठाकरे यांच्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही नेत्याच्या नावाला नकार दिला तर, ही परिस्थिती राहणार आहे.

आणखी वाचा : पवार म्हणाले, मुख्यमंंत्रिपदासाठी 'या' नावावर सहमती

आणखी वाचा : दुसऱ्या क्रमांकाचं मंत्रिपद कोणाला मिळणार?

इतिहास काय सांगतो?
काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सोबतीने शिवसेना सरकारा स्थापन करत आहे. सध्या या तिन्ही पक्षांच्या स्वतंत्र विचारसरणीवरून मीडियामध्ये तसेच सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. पण, देशात यापूर्वीही वेगवेगळ्या विचारसरणीचे पक्ष एका व्यासपीठावर आले आहे. विशेषतः दिल्लीतील सत्ता केंद्र जास्त दबाव टाकत असताना, अनेक विरुद्ध विचारसरणीचे पक्ष एकत्र आले आहेत. इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळात 1977मध्ये उजव्या विचारसरणीच्या नेत्यांनी डाव्यांशी हातमिळवणी केली होती. त्यावेळी लालकृष्ण अडवानी, अटलबिहारी वाजपेयी हे मधू दंडवते यांच्यासोबत एकत्र आले होते. त्यामुळं महाराष्ट्राच्याच नव्हे तर, देशा राजकारणाने अशा वेगळ्या विचारसरणीच्या लोकांना एकत्र आल्याचे पाहिले आहे. त्यामुळं काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र आल्याचे खूप मोठे आश्चर्य वाटून घेण्याचे कारण नाही. 

(ब्लॉगमधील मते ही लेखकाची स्वतःची आहेत.)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: rohit chandavarkar writes blog about uddhav thackeray