
विजय शिवतारे, हर्षवर्धन पाटील यासारख्या राजकीय शत्रूंना पराभूत करत पुणे जिल्ह्यात पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा अजित पवारांनी रोवला. मात्र, पक्षाला इतकं जबरदस्त यश मिळवून देणाऱ्या अजित पवारांना राज्याचं गृहमंत्रिपद मिळणार का, हाच सवाल सध्या विचारला जातोय. त्याला कारणंही तशी आहेत. अजित पवार एक जबरदस्त प्रशासक असले तरी त्यांच्यावर असलेल्या आरोपांमुळे गृहमंत्रिपदाच्या वाटेत अनेक अडचणी येऊ शकतात. मात्र, तरीही त्यांना हे पद का मिळू शकतं, याची काही कारणं पाहूया.
मात्र, अजित पवारांचे हेच उत्तम गुण कधीकधी त्यांच्यासाठी निगेटिव्ह ठरतात. सर्वांत पहिलं म्हणजे त्यांचा रोखठोक आणि फटकळ स्वभाव. त्यामुळे अनेकदा त्यांचा हेतू नसतानाही अनेक जण दुखावले जातात. याशिवाय अजित पवारांची जीभ घसरण्याच्या अनेक घटना घडल्यात. त्यामुळे वाद अजित पवारांना नवे नाहीत. त्यातच सिंचन घोटाळ्याच्या आरोपांचं भूत काही केल्या त्यांचा पिच्छा सोडत नाही.
अजित पवारांना गृहमंत्रिपद नाही मिळालं तर राष्ट्रवादीतून दुसरं नाव समोर येतं ते म्हणजे जयंत पाटील यांचं.
राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होण्याची केवळ औपचारिकता उरलीय. त्या पार्श्वभूमीवर आता मंत्रिमंडळातलं हे नंबर दोनचं पद कोणाला मिळणार, याकडेच सर्वांचं लक्ष लागलंय.
Webtitle : these two leaders of NCP may get home minister post in Maharashtra cabinet