Rohit Pawar : मंत्री जयकुमार गोरेंच्या विरोधात हक्कभंग आणू : रोहित पवार ; सभागृहाला खोटी माहिती दिल्याचा केला आरोप
Mumbai Legislative Assembly : ज्या सभागृहात सर्वसामान्य लोकांचे प्रश्न मांडले जातात, त्याच सभागृहातील अध्यक्ष आणि आमदारांना खोटी माहिती देऊन मंत्री गोरे यांनी दिशाभूल केली आहे.
मुंबई : राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे हे स्वतःला वाचविण्यासाठी विधानसभेची दिशाभूल करत आहेत. त्यांच्या विरोधात आपण हक्कभंग आणणार आहोत, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.