...या नगरसेवकाच्या घराचे छत कोसळले

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 1 नोव्हेंबर 2019

कोपरखैरणेमधील नवी मुंबई महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ४९ मधील शिवसेनेचे नगरसेवक रामदास पवळे यांच्या सिडकोकालीन घराचा सज्जा कोसळला. गुरुवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. यामध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. 

वाशी : कोपरखैरणेमधील नवी मुंबई महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ४९ मधील शिवसेनेचे नगरसेवक रामदास पवळे यांच्या सिडकोकालीन घराचा सज्जा कोसळला. गुरुवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. यामध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. 

कोपरखैरणे सेक्‍टर- १० मधील चंद्रलोक को-ऑप हौसिंग सोसायटीमधील खोली क्रमांक ७-ए ८ मध्ये नगरसेवक रामदास पवळे राहतात. सिडकोकालीन असणारी कोपरखैरणेमधील घरे ३० वर्षांपूर्वी बांधण्यात आली. जीर्ण झालेल्या घरामुळे छत कोसळण्याचे प्रकार घडत आहेत. चंद्रलोक सोसायटीमध्ये देखील १८८ कुटुंबे राहतात. येथील घरे जीर्ण झाल्यामुळे छत कोसळण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे येथील रहिवाशांना जीव मुठीत धरून राहावे लागत आहे. छत कोसळल्यानंतर पालिकेचे अभियंता अमित पवार यांनी या ठिकाणी पाहणी केली.

३० वर्षांपूर्वीचे सिडकोनिर्मित बांधकाम असून, या अतिधोकादायक इमारती घोषित झालेल्या आहेत. मात्र, येथील रहिवाशांचे एकमत नसल्याने पुनर्बांधणीसंदर्भात मतभेद असल्याने पुनर्बांधणी प्रस्ताव रखडलेला आहे. त्यामुळे भविष्यात मोठी दुर्घटना होऊ शकते
- रामदास पवळे, नगरसेवक.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ... the roof of this councilor's house collapsed