
मुंबई : कर्नाटकच्या आलमट्टी धरणाच्या पाण्यामुळे कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांत पूरस्थिती निर्माण होते का, याबाबत समस्या उद्भवते का, याचा अभ्यास रुरकी येथील भारतीय जलविज्ञान संस्थेकडून सुरू आहे. मात्र, या संस्थेचा अहवाल येण्यास किमान तीन महिने लागणार आहेत. हा अहवाल आल्यानंतर राज्य सरकारची भूमिका स्पष्ट होणार आहे. दरम्यानच्या काळात कोणतीही चौकशी किंवा बैठक होण्याची शक्यता वरिष्ठ अधिकाऱ्यांनी फेटाळून लावली आहे.