मध्य रेल्वेवरील पहिली AC लोकल धावणार 'या' मार्गावर..

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 11 December 2019

मध्य रेल्वेची पहिली वातानुकूलित (एसी) लोकल लवकर सुरू करण्याबाबत रेल्वे प्रशासन आणि प्रवासी संघटनांमध्ये बैठक पार पडली. या बैठकीत पहिली एसी लोकल ट्रान्स हार्बरवरील ठाणे-वाशी-पनवेल या मार्गावर चालविण्याचा निर्णय घेण्यात आला. 

मुंबई  : मध्य रेल्वेची पहिली वातानुकूलित (एसी) लोकल लवकर सुरू करण्याबाबत रेल्वे प्रशासन आणि प्रवासी संघटनांमध्ये बैठक पार पडली. या बैठकीत पहिली एसी लोकल ट्रान्स हार्बरवरील ठाणे-वाशी-पनवेल या मार्गावर चालविण्याचा निर्णय घेण्यात आला. 

त्याबरोबर मार्च 2020 मध्ये येणारी दुसरी एसी लोकल आसनगाव मार्गावर चालविण्यात यावी, अशी मागणी प्रवासी संघटनेने मध्य रेल्वेकडे केली. प्रवासी संघटना आणि मध्य रेल्वे प्रशासनामध्ये बुधवारी नवीन एसी लोकलमधील अपुऱ्या सुविधांवर बैठक पार पडली.

हेही वाचा : मध्य रेल्वेचं वेळापत्रक बदललं, पाहा पूर्ण वेळापत्रक..

या वेळी एसी लोकलमध्ये सीसी टीव्ही कॅमेरा, मोबाईल चार्जिंग पॉईंट बसविण्याची मागणी प्रवासी संघटनेने केली. नियमित लोकल फेरी रद्द न करता एसी लोकल स्वतंत्र चालवा, 12 डब्याच्या लोकलला तीन एसी डब्यांची जोडणी करावी, डोंबिवलीच्या नवीन पादचारी पुलाचे काम एप्रिलपर्यंत पूर्ण करावे, अशी मागणी प्रवासी संघटनेने केली आहे. 

हेही वाचा :  स्पृहाला गेल्या काही महिन्यांपासून सतावतेय 'ही' भिती..
 

नवीन AC लोकल बद्दल : 

  • सुमारे 50 कोटी रुपये खर्च करून ही लोकल "मेक इन इंडिया' धोरणातंर्गत बांधली गेलीये. 
  • भेल ( भारत हेवी इलेक्‍ट्रिकल लिमिटेड ) ने या ट्रेनसाठी विद्युत यंत्रणा पुरविली आहे.
  • चेन्नईतील "आयसीएफ' कारखान्यात ही लोकल तयार करण्यात आली आहे.
  • या AC लोकलमध्ये स्वयंचलित दरवाजे असल्याने त्याबाबत वारंवार उद्घोषणा केली जाणार आहे.
  • लोकलमध्ये CCTV कॅमेरे असून आपातकालीन परिस्थिती उदभवल्यास किंवा दरवाजा लवकर बंद न झाल्यास मदतीसाठी मध्य रेल्वेने 100 कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण दिलेले आहे.
  • एसी लोकल चालविताना येणाऱ्या तांत्रिक गोष्टीचा आढावा घेऊन पश्‍चिम रेल्वेकडून हे प्रशिक्षण घेतले असल्याचे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी सांगितले. 

WebTitle : on this rout first AC tain of central railway will run


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: on this rout first AC tain of central railway will run