रॉयल पाम्समधील क्‍लबला आग

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 19 एप्रिल 2019

मुंबई - गोरेगाव येथील आरे वसाहत परिसरातील रॉयल पाम्स संकुलामधील एमराल्ड क्‍लबच्या तळघरात आग लागून सहा कर्मचारी जखमी झाले. त्यांच्यावर ऐरोलीतील नॅशनल बर्न सेंटरमध्ये उपचार सुरू असून, एका जखमीची प्रकृती चिंताजनक आहे.

रॉयल पाम्स संकुलातील एमराल्ड क्‍लबच्या तळघरातील स्टीम आणि सौना बाथमध्ये गुरुवारी सकाळी 10.15 वाजण्याच्या सुमारास आग लागली. या आगीत अंकित मोडलकर (29), जितेंद्र तिवारी (33), दिनेश सॉंग (43), संदीप शेट्टी (30), राहुल सिंग (39) आणि मनोज पंत (21) हे सहा जण होरपळून जखमी झाले. त्यांच्यावर ऐरोलीतील नॅशनल बर्न सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. सुमारे 80 टक्के होरपळलेल्या मोडलकर यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले. गुरुवारी सकाळी सव्वादहाच्या सुमारात लागलेली आग अग्निशमन दलाने अर्ध्या तासात आटोक्‍यात आणली. वीजवाहिन्या आणि ज्वलनशील साहित्याने पेट घेतल्यामुळे तळघरात धूर पसरला होता. क्‍लबच्या तळघरातील ज्वलनशील साहित्यामुळे आग भडकली असावी, असा अंदाज आहे.

Web Title: Royal Palms Club Fire