रिपब्लिकन पक्षाला भाजपचा कात्रजचा घाट 

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 8 फेब्रुवारी 2017

मुंबई - मुंबई महापालिका निवडणुकीत जागा वाटपात भाजपने घटक पक्ष असलेल्य रिपब्लिकन पक्षाला 25 जागा घोषित केल्या; मात्र प्रत्यक्ष 19 जागा दिल्या आहेत. त्यामुळे जागा वाटपात भाजपने "आरपीआय'ला (आठवले गट) कात्रजचा घाट दाखवल्याची भावना पक्ष कार्यकर्त्यांची झाली आहे. 

भाजपने मुंबईत घटक पक्षाला काही जागा दिल्याची घोषणा केली. त्यामध्ये केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या "आरपीआय'ला 25 जागा देण्याचे जाहीर केले होते. प्रत्यक्षात या पक्षाला 19 जागा दिल्या आहेत. अन्य ठिकाणी भाजपच्या उमेदवारांनी अर्ज भरला असून त्यांना पक्षाने "एबी' अर्ज दिला आहे. भाजपचे अधिकृत उमेदवार या सहा ठिकाणी माघार घेण्याच्या मन:स्थितीत नाहीत. त्यामुळे मुंबई भाजपचे पदाधिकारी या उमेदवारांची मनधरणी करीत असले तरी ते अर्ज मागे घेण्याच्या मन:स्थितीत नाहीत. त्यामुळे रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांत अस्वस्थता पसरली आहे. 

"आरपीआय'चे प्राबल्य ज्या प्रभागात आहे, याच प्रभागावर भाजपचे उमेदवार दावा करीत आहेत. त्यामुळे रिपब्लिकन कार्यकर्ते नाराज आहेत. 

Web Title: rpi & bjp in bmc