
Digital Education
ESakal
मुंबई : राज्यभरातील अल्पसंख्याक शाळांमध्ये डिजिटल शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारच्या योजनेतून २०० कोटी रुपये मिळाले आहेत. त्यातून एक हजार ३४० शाळांमध्ये ‘स्मार्ट क्लासरूम’ आणि माहिती तंत्रज्ञान प्रयोगशाळा उभारण्यात येत आहेत. विशेष म्हणजे यापैकी ३०५ शाळांना दोन्ही प्रयोगशाळांचा दुहेरी फायदा होणार असून, डिजिटल शिक्षणाचा दर्जा उंचावण्यास मदत होणार आहे.