मुंबई विमानतळावर 69 लाख रुपये जप्त

वृत्तसंस्था
बुधवार, 28 डिसेंबर 2016

मुंबई - मुंबई विमानतळावर आज (बुधवार) सकाळी दोन वेगवेगळ्या ठिकाणांहून सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी 69 लाख रुपये जप्त केले. यामध्ये 25 लाख रुपयांच्या दोन हजारांच्या नव्या नोटा आहेत.

मुंबई - मुंबई विमानतळावर आज (बुधवार) सकाळी दोन वेगवेगळ्या ठिकाणांहून सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी 69 लाख रुपये जप्त केले. यामध्ये 25 लाख रुपयांच्या दोन हजारांच्या नव्या नोटा आहेत.

सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी ही कारवाई करण्यात आली आहे. हैदराबादहून मुंबईत दाखल झालेल्या शेख वाहिद अली, मोहम्मद सोहेल आणि शेख पाशा या तिघांकडून 43 लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत. यामध्ये 1,39,000 सौदी रियाल्स, 5.65.000 युएई डिरहॅम्स आमि 14,000 ऑस्ट्रेलियन डॉलरचा समावेश होता. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर या तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे. वृत्तपत्रामध्ये लपवून हे सर्वजण विमानतळाबाहेर पडत होते. सौदी अरेबियातून हे सर्व पैसे आणण्याचे या तिघांचे म्हणणे आहे.

तर दुसरीकडे दुबईला प्रस्थान करत असलेल्या अरिफ कोयांते याच्याकडे 25 लाख रुपये सापडले. त्यामध्ये दोन हजारांच्या नोटांचा समावेश होता. 52 वेगवेगळ्या पाकिटांमध्ये या नोटा ठेवण्यात आल्या होत्या. 

Web Title: Rs 69 Lakh Seized From Mumbai Airport; Four Arrested