ईडीने जप्त केलेले 75 कोटी गुन्हाचा भाग नाही; चंदा कोचर यांना दिलासा

ईडीने जप्त केलेले 75 कोटी गुन्हाचा भाग नाही; चंदा कोचर यांना दिलासा

मुंबई : हजारो कोटींच्या गैरव्यवहार प्रकरणात कारवाई सुरू केलेल्या आयसीआयसीआय बैकेच्या माजी सीईओ चंदा कोचर आणि दिपक कोचर यांना  दिलासा मिळाला आहे.  कोचर यांची ईडीने जप्त केलेली सुमारे 75 कोटी रुपयांची मालमत्ता संबंधित गुन्हाचा भाग नाही, असा निर्वाळा पीएमएलए कायद्याअंतर्गत संलग्न समितीने दिला आहे.

ईडीने कोचर यांच्या विरोधात कारवाई सुरू केली असून काही मालमत्तांंवर जप्ती आणली आहे. यामध्ये फ्लॅट, जमीन, पैसे, तामिळनाडू मधील विंडफ्राम प्रोजेक्टमधील मशिनरी आदींचा जप्त मालमत्तेमध्ये समावेश आहे. ही मालमत्ता सुमारे 78 कोटी रुपयांची आहे. मात्र दाखल केलेल्या गुन्ह्याशी या मालमत्तेचा संबंध नाही, असे मत समितीने व्यक्त केले आहे. या निर्णयाविरोधात अपिलीय यंत्रणेकडे अपिल मागू असे ईडिकडून सांगण्यात आले आहे.

व्हिडिओकोन इंटरनैशनल इलेक्ट्रॉनिक लिमिटेडसाठी चंदा कोचर यांच्या समितीने सुमारे 300 कोटी रुपये सन 2009 मध्ये मंजूर केले होते. मात्र नियमांचे उल्लंघन करून ही कर्जे मंजूर केली, असा आरोप ईडीने ठेवला असून तपास सुरू केला आहे. तीनशे कोटीमधील काही रक्कम कोचर यांच्या पतीच्या कंपनीत वर्ग केल्याचा आरोप ईडीने ठेवला आहे. कोचर यांच्या विरोधात बैकेनेही कारवाई केली होती. मात्र या रकमेचा गुन्ह्याशी संबंध नाही, कंपनीच्या करारानुसार ही रक्कम होती, असे समितीने म्हटले आहे.

The Rs 75 crore seized by the ED is not part of the crime; Consolation to Chanda Kochhar

---------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com