महापालिकेच्या विरोधात रासपाचा धडक मोर्चा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जुलै 2019

मागच्या दोन वर्षापासुन वसई विरार नालासोपारा शहरातील नागरिकांना पुर परिस्थीतिचा सामना करावा लागत आहे. थोडासा जरी पाऊस झाला की, शहर जलमय होऊन पुर्ण शहरात हाहाकार माजत आहे.

नालासोपारा : मागच्या दोन वर्षापासुन वसई विरार नालासोपारा शहरातील नागरिकांना पुर परिस्थीतिचा सामना करावा लागत आहे. थोडासा जरी पाऊस झाला की, शहर जलमय होऊन पुर्ण शहरात हाहाकार माजत आहे.

महानगरपालिकेच्या अकार्यक्षमतेमुळेच पावसाचे, गटाराचे पाणी तुंबुन परिसरात रोगराई पसरत आहे. याचा नाहक त्रास येथील करदात्या नागरिकांना सहन करावा लागत आहे. याला सर्वस्वी जबाबदार महापालिकेचे भ्रष्ट अधिकारी-कर्मचारी आहेत. त्यांना त्यांच्यावर कडक कारवाई करावी या मागणीसाठी आज सोमवार (ता. 29) राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष नितीन पेंढारि यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेच्या विरार कार्यालयावर धडक मोर्चा काडण्यात आला होता.

महापालिकेच्या गेटवर आंदोलनकर्ते आणी सुरक्षा रक्षकात बाचाबाचीही झाली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: RSP Strikes against Municipal Corporation in Nalasopara