
मुंबईत मराठी भाषा शिकणे गरजेचे नाही, या कालच्या विधानावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह भैयाजी जोशी यांनी आज त्या विधानापासून घुमजाव केला आहे. मुंबई-महाराष्ट्रात प्रत्येकाने मराठी भाषा शिकलीच पाहिजे, असे विधान त्यांनी स्पष्टीकरणात दिले आहे. त्यांच्या वक्तव्याने महाराष्ट्रात तीव्र पडसाद उमटले होते.