आरटीई प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ; विद्यार्थ्यांना 'या' तारखेपर्यंत घेता येणार प्रवेश!

तेजस वाघमारे
Monday, 31 August 2020

आरटीई प्रवेश प्रक्रियेला यंदा कोरोनाचा फटका बसला आहे. 17 मार्चला सोडत काढल्यानंतर पालकांना प्रवेशासाठी तारीख देऊनही अद्याप 1 लाख 15 हजार 455 जागांपैकी केवळ 54 हजार 584 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्‍चित झाले आहेत. प्रतिसाद कमी झाल्याने सोडतीमध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी 15 सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. 

मुंबई : आरटीई प्रवेश प्रक्रियेला यंदा कोरोनाचा फटका बसला आहे. 17 मार्चला सोडत काढल्यानंतर पालकांना प्रवेशासाठी तारीख देऊनही अद्याप 1 लाख 15 हजार 455 जागांपैकी केवळ 54 हजार 584 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्‍चित झाले आहेत. प्रतिसाद कमी झाल्याने सोडतीमध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी 15 सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. 

दुर्दैवी घटना : गॅरेजच्या गाडी धुण्याच्या रॅम्पच्या खड्ड्यात पडून चिमुकलीचा मृत्यू

प्राथमिक शिक्षण संचालनालयाद्वारे खासगी शाळांमधील 25 टक्के जागांवर आरटीई प्रवेशप्रक्रिया राबवण्यात येते. आरटीई प्रवेश प्रक्रियेची सोडत ऑनलाईन राबवण्यात येत असून, यंदा 17 मार्चला सोडत काढण्यात आली. राज्यातील 9 हजार 331 शाळांमधील 1 लाख 15 हजार 455 जागांसाठी 2 लाख 91 हजार 368 अर्ज आले होते. त्यातील पहिल्या सोडतीमध्ये 1 लाख 926 विद्यार्थी विजयी ठरले. 

ही बातमी वाचली का? घंटानाद आंदोलनाची छायाचित्रे पाहिल्यावर समजलं की...शिवसेनेचा भाजपला चिमटा

या विद्यार्थ्यांना प्रवेश निश्‍चित करण्यासाठी 31 ऑगस्टपर्यंत मुदत दिली होती; मात्र आतापर्यंत फक्त 55 हजार 107 विद्यार्थ्यांनी तात्पुरते प्रवेश घेतले आहेत. त्यातील 54 हजार 584 विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्‍चित केले. त्यामुळे निम्म्यापेक्षा कमी विद्यार्थ्यांनी प्रवेश प्रक्रियेला प्रतिसाद दिला. त्यामुळे प्रवेश घेण्यास मुदतवाढ दिली आहे. या कालावधीत प्रतीक्षा यादीतील पालकांनी बालकाच्या प्रवेशासाठी शाळेत जाऊ नये. त्यांच्यासाठी पोर्टलवर नंतर सूचना दिल्या जातील, असे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. 
-----------------------------
(संपादन : गोरक्षनाथ ठाकरे)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: RTE admission process extended till September 15