रिक्षा चालकांविरोधात कारवाई सुरू; विशेष पथकाची निर्मिती

रविंद्र खरात
रविवार, 1 एप्रिल 2018

तक्रारी साठी ई मेल आयडी .... आणि कारवाई ...
प्रवासी वर्गाला रिक्षा चालक या ना त्या कारणाने त्रास देत असतो त्यासाठी तक्रारी साठी कल्याण आरटीओ ने ईमेल आयडी सुरू केली असून ऑगस्ट 2017 ते मार्च 2018 या कालावधीत या ई मेल वर 116 तक्रारी प्राप्त झाल्या असून 13 तक्रारी निकाली काढत त्या रिक्षा चालकाकडून 13 हजार 300 रुपये दंड वसूल करण्यात आला तर 101 तक्रारी पैकी 46 वाहनावर परवाना उपस्थित न झाल्याने त्यांचे परवाने 10 ते 20 दिवसासाठी परवाने निलंबित केले आहे .या वाहनांची लिस्ट जाहीर केली असून यांच्या विशेष पथक कारवाई करणार असून 39 वाहन चालकांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

कल्याण : कल्याण डोंबिवलीमध्ये रिक्षा चालकांनी मीटर प्रमाणे भाडे प्रवासी वर्गाकडून घ्यावे असे आदेश कल्याण आरटीओ मार्फत देण्यात आले, मात्र या आदेशाचे पालन करणाऱ्या रिक्षा चालकांवर कल्याण, ठाणे आरटीओ आणि वाहतूक पोलिसांच्या संयुक्त विशेष पथका मार्फत कल्याण आरटीओ कार्यालय अंतर्गत येणाऱ्या कल्याण डोंबिवली सहित अन्य शहरात कारवाई सुरू करण्यात आली असून विशेष म्हणजे या विशेष पथकातील अधिकारी कर्मचारी वर्गाने साध्या वेशात कारवाई करा असे आदेश कल्याण आरटीओ उप प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय ससाणे यांनी दिले आहेत. 

कल्याण आरटीओ अंर्तगत कल्याण डोंबिवली ठाकुर्ली कल्याण ग्रामीण टिटवाळा मुरबाड ग्रामीण बदलापूर अंबरनाथ उल्हासनगर विठ्ठलवाडी आदी शहरांचा समावेश होतो. रिक्षाना परवाना देताना प्रवाशांकडून मीटर पध्दतीने भाडे आकारावे अशी अट घातलेली असते. मात्र या अनेक शहरातील भौगोलिक रचना आणि नागरिकांची मागणी पाहता काही भागात शेअर पद्धतीने रिक्षा प्रवास सुरु झाला. मात्र यात ही रिक्षा चालकांनी पळवाट करत प्रवासी वर्गाकडून वाढीव भाडे घेण्यास सुरुवात केल्याने प्रवासी आणि रिक्षा चालकांमध्ये वाद सुरू झाले याचे पडसाद तक्रारी सुरू झाल्या. अनेक सामाजिक संघटना आणि प्रवासी संघटनांनी कल्याण आरटीओ कार्यालयाचे लक्ष्य वेधले. याचधर्तीवर कल्याण आरटीओ उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय ससाणे यांनी काही दिवसांपूर्वी एक पत्रक काढून रिक्षा संघटना आणि रिक्षा चालकांना आवाहन केले होते की प्रवासी वर्गाशी सौजन्याने वागा, जेथे प्रवासी मिटर प्रवास मागत असेल तेथे त्याला सुविधा द्या, या सूचनांचे काही रिक्षा संघटनांनी स्वागत करत रिक्षा चालकांचे प्रबोधन केले मात्र काही रिक्षा चालक आज ही नियमांचे पालन करत नसल्याचे समोर आले आहे, याबाबत आरटीओ कार्यालय मध्ये अधिकारी वर्गाची आढावा बैठक घेऊन कठोर कारवाई करण्याचे आदेश आरटीओ अधिकारी ससाणे यांनी दिले आहेत.

विशेष पथकाची निर्मिती ...
ठाणे, कल्याण आरटीओ, वाहतूक पोलिसांच्या विशेष पथकाची निर्मिती करण्यात आली असून हे पथक साध्या वेशात अचानक रिक्षा चालकांवर कारवाई करण्यास सुरुवात केली असून गणवेश परिधान न करणे,जादा भाडे घेणे, जादा प्रवासी वाहतूक , बिल्ला प्रदर्शित न करणे, मीटर प्रमाणे जाण्यास नकार देणे किंवा भाडे नाकारणे , अश्या रिक्षा चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यास सुरुवात केल्याची माहिती कल्याण आरटीओ उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय ससाणे यांनी दिली.

1 एप्रिल 2017 ते 31 मार्च 2018 या कालावधीत 1051 बेशिस्त रिक्षा चालकांवर कारवाई करण्यात आली .त्यांच्या कडून सुमारे 15 लाख 54 हजार 800 रुपयांचा दंड वसूल करण्यात यात अनेकांचे परवाने आणि लायसन्स निलंबन ही करण्यात आले आहे. 

तक्रारी साठी ई मेल आयडी .... आणि कारवाई ...
प्रवासी वर्गाला रिक्षा चालक या ना त्या कारणाने त्रास देत असतो त्यासाठी तक्रारी साठी कल्याण आरटीओ ने ईमेल आयडी सुरू केली असून ऑगस्ट 2017 ते मार्च 2018 या कालावधीत या ई मेल वर 116 तक्रारी प्राप्त झाल्या असून 13 तक्रारी निकाली काढत त्या रिक्षा चालकाकडून 13 हजार 300 रुपये दंड वसूल करण्यात आला तर 101 तक्रारी पैकी 46 वाहनावर परवाना उपस्थित न झाल्याने त्यांचे परवाने 10 ते 20 दिवसासाठी परवाने निलंबित केले आहे .या वाहनांची लिस्ट जाहीर केली असून यांच्या विशेष पथक कारवाई करणार असून 39 वाहन चालकांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

मीटर ने प्रवास मागितल्यास रिक्षा चालकाने तो द्यावा , शहरात मीटर प्रवास बाबत सर्वे सुरू असून , रिक्षा चालकांना आवाहन करून अंमलबजावणी करत नसल्याचे तक्रारी पाहता विशेष मोहीम हाती घेतली असून ठाणे , कल्याण आरटीओ पथक आणि वाहतूक पोलीस यांच्या पथकामार्फत कारवाई सुरू केली असून रिक्षा चालकांनी शिस्तीचे पालन करावे असे आवाहन कल्याण आरटीओ उप प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय ससाणे यांनी केले आहे.

Web Title: RTO action against auto rickshaw drivers in Kalyan