ऑनलाईन सेवांच्या विरोधात आरटीओ अधिकारी, कर्मचाऱ्यांचा एल्गार

ऑनलाईन सेवांच्या विरोधात आरटीओ अधिकारी, कर्मचाऱ्यांचा एल्गार

मुंबई : मलाईदार विभाग म्हणून प्रसिद्ध असलेल्या आरटीओच्या शिकाऊ वाहन चालक लायसन्स आणि वाहन नोंदणी ऑनलाईन झाल्याने आरटीओ कार्यालयातील मोटार वाहन विभाग कर्मचारी संघटना (आरटीओ), कार्यकारी अधिकारी संघटनानी परिवहन विभागाच्या विरोधातच एल्गार पुकारला आहे. ऑनलाईन सेवांमध्ये प्रचंड त्रुट्या असल्याचा आरोप करत परिवहन मंत्री अनिल परब, परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे यांना आतापर्यंत निवेदन देण्यात आले असून, अधिकारी, कर्मचारी संघटना मंगळवारी अवर मुख्य सचिव आशिष कुमार सिंह यांची भेट घेणार आहे.

ऑनलाईन सेवांच्या विरोधात आरटीओ अधिकारी, कर्मचाऱ्यांचा एल्गार
गंगेतील मृतदेहांच्या SIT चौकशीवर भाष्य करण्यास SCचा नकार

शिकाऊ वाहन चालक लायसन्स आणि वाहन नोंदणीमध्ये पारदर्शकता यावी यासाठी परिवहन आयुक्तांनी या दोनही सेवा ऑनलाईन करण्याचा निर्णय घेतला होता.दरम्यान 7 जून रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण सुदधा करण्यात आले. मात्र, त्यामध्ये त्रुट्या असल्याचा आरोप खुद्द परिवहन विभागाच्या कार्यकारी अधिकारी संघटना आणि मोटार वाहन विभाग कर्मचारी संघटनेने केला आहे. त्यासोबतच ऑनलाईन सेवेतील त्रुट्या आणि त्यामुळे महसुलाचे होणारे नुकसान समजावून सांगण्याचा दोनही संघटनाचा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे.

आरटीओच्या कार्यकारी अधिकारी संघटनांनी यापूर्वी परिवहन मंत्री अनिल परब यांची भेट घेऊन यासबंधीत चर्चा केली असून बदल करण्यासाठी परिवहन मंत्री तयार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. तर आरटीओतील कर्मचारी संघटनांनी सोमवारी परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे यांना निवेदन सादर करून आपले म्हणणे मांडले आहे. त्यानंतर मंगळवारी या दोनही संघटना परिवहन विभागाचे अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंह यांची भेट घेऊन आपले म्हणणे मांडणार आहे.

ऑनलाईन सेवांच्या विरोधात आरटीओ अधिकारी, कर्मचाऱ्यांचा एल्गार
कोरोना चाचण्यांसह लसीकरण वाढवा- आरोग्यमंत्री राजेश टोपे

राज्य शासनाचे ऑनलाईन कार्यप्रणालीचे धोरण आहे. त्याप्रमाणे आपल्याला आरटीओच्या सेवा कधीतरी ऑनलाईन कराव्याच लागणार आहे. त्याची सुरुवात झाली असून, काही त्रुट्या असल्यास त्या बदलणे सुरूच आहे. काळानुरूप ऑनलाईन कार्यप्रणाली आपण सगळ्यांनाच वापरावी लागणार आहे.

- अविनाश ढाकणे, आयुक्त, परिवहन विभाग

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com