धक्कादायक! कोरोना नंतर टोमॅटो व्हायरसचा जगाला धोका

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 फेब्रुवारी 2020

फ्रांन्समध्ये एका नव्या विषाणूच्या आजाराने नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर भीती पसरली आहे. या विषाणूच्या चर्चांनी फ्रान्सचे
नागरिक भयभित झाले आहे. या विषाणू मानसांवर नाही तर, टोमॅटोवर हल्ला केला केला.

चीनमध्ये थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूच्या रोगामुळे आतापर्यंत हजारो नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या रोगावर लस उपलब्ध नसल्याने जागतिक आरोग्य संघटनेनेही ही आंतरराष्ट्रीय आपत्ती असल्याचे म्हटले आहे. त्यातच फ्रांन्समध्ये एका नव्या विषाणूच्या आजाराने नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर भीती पसरली आहे. या विषाणूच्या चर्चांनी फ्रान्सचे
नागरिक भयभित झाले आहे. या विषाणू मानसांवर नाही तर, टोमॅटोवर हल्ला केला केला. फ्रान्समधील टोमॅटोची शेते या विषाणूमुऴे नष्ट होत असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे फ्रान्समधील टोमॅटो उत्पादनावर मोठे संकट ओढावले आहे.

कसाबच्या हाती हिंदूंचं पवित्र बंधन!  कसाबबद्दल राकेश मारिया म्हणतात...

फ्रान्सच्या फिनिस्टरमध्ये टोमॅटोच्या झाडांवर एका घातक विषाणूंचे संक्रमण झाले आहे. या संक्रमित झालेल्या विषाणूमुळे संपुर्ण शेत नष्ट होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या विषाणूवर कोणताही उपचार नसल्याचे फ्रान्सच्या कृषी मंत्रालयाने सांगितले आहे. त्यामुळे शेतातील इतर पिकांना नुकसान होऊ नये म्हणून शेतकऱ्यांनी विषाणूग्रस्त टोमॅटोला नष्ट
करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. या विषाणूची लागण झाल्यानंतर टोमॅटो खाण्यालायक राहत नाही. त्यांच्यावर डाग पडतात. या विषाणूचा मनुष्यावर कोणताही परिणाम होत नसल्याचे दिसून आले आहे. परंतु टोमॅटोची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.

मी टेरेसवर फिरून येतो म्हणून शाह गेले आणि खाली सापडली डेड बॉडी... 

फान्सप्रमाणे युरोपातील इटली, स्पेनमधील टोमॅटोच्या पिकाला या विषाणूची लागण झाली असल्याचे समोर येत आहे, त्यामुळे यावर कृषी मंत्रालय लवकरात लवकर उपाय शोधण्याच्या प्रयत्नात आहेत. युरोपातील स्पेने आणि इटली येथे टोमॅटोचे सर्वाधिक उत्पादन घेतले जाते. त्यामुळे तेथिल शेतकरी देखिल या विषाणूबाबत काळजी घेत आहेत. आपल्या शेतातील
टोमॅटोवर तशी लक्षणे दिसल्यास पिक नष्ट केले जात आहेत. या विषाणूची माहिती सर्वात आधी 2014 साली इज्राईलमध्ये झाली होती. ब्रिटनमध्ये 2018 साली या विषाणूचे लागण झाल्याचे पहिले प्रकरण समोर आले होते. परंतु त्यानंरत फ्रान्समध्ये या विषाणूने टोमॅटोच्या पिकावर हल्ला केल्याचे दिसून येत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: World threat to tomato virus after corona