आरटीई प्रवेश प्रक्रियेबद्दल समाज माध्यमांवर अफवा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 12 जानेवारी 2020

आरटीई प्रवेश प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येईल

मुंबईः बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क (आरटीई) कायद्यांतर्गत शाळांतील २५ टक्के राखीव जागांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्याचे संदेश समाज माध्यमांवर फिरू लागले आहेत. या संदेशांत तथ्य नसल्याचे मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. आरटीई प्रवेश प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येईल आणि पालकांना माहिती देण्यात येईल, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

हे पाहाः खुशखबर! पुणे विद्यापीठात प्राध्यापकांच्या जागा भरणार

फेब्रुवारी-मार्चमध्ये आरटीईच्या प्रवेश प्रक्रियेला सुरूवात

आरटीई कायद्यांतर्गत गरीब आणि दारिद्य्र रेषेखालील विद्यार्थ्यांना खासगी शाळांमध्ये प्रवेशाची संधी देण्यात येते. त्यामुळे अनेक पालक आरटीई प्रवेश प्रक्रियेची वाट आतुरतेने पाहत असतात. साधारणतः फेब्रुवारी-मार्चमध्ये आरटीईच्या प्रवेश प्रक्रियेला सुरूवात होते. परंतु काही दिवसांपासून व्हॉट्सअॅपवरून आरटीई प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्याचे संदेश मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. हे संदेश पाहून पालकांनी शाळांकडे विचारणा करणे सुरू केले आहे.

हे पाहाः मुंबई विद्यापीठाचे विभाजन होणार! 

आरटीई प्रवेश प्रक्रिया अद्याप सुरू झालेली नसून, यासंदर्भातील निर्णय व तपशील राज्य सरकारकडून जाहीर करण्यात येतो. तशी कोणतीही माहिती अद्याप राज्य सरकारकडून आलेली नाही, असे मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागातील एका अधिकाऱ्याने सांगितले. त्यामुळे समाज माध्यमांवर फिरत असलेले संदेश असत्य असून, त्याकडे दुर्लक्ष करावे, असे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे.

हे पाहाःभाडेकरारासंदर्भात मोठी बातमी: ऑनलाइन रजिस्टर्ड भाडेकरारामुळे आता...

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rumours about Right to Education on social media