4 रूपये स्वस्त पेट्रोलमुळे पंपांवर अलोट गर्दी

दिनेश गोगी
गुरुवार, 14 जून 2018

उल्हासनगर : एकीकडे भाजपा सरकार पेट्रोलची अनेक रुपयांनी दरवाढ करते आणि लागलीच काही पैशांनी दरवाढीला कमी करुन स्वतःचे हसे करत असतानाच, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने उल्हासनगरातील महाराष्ट्र नवनिर्माण कामगार कर्मचारी सेनेचे पालिका युनिट अध्यक्ष दिलीप थोरात यांच्या पुढाकाराने आज दुचाकीस्वारांना एका लिटरमागे 4 रुपये पेट्रोल स्वस्तचा तोहफा देण्यात आला आहे. हजारो दुचाकीस्वारांनी याचा लाभ घेतल्याने श्रीराम चौकातील पंपावर अलोट गर्दी उसळली आहे. 

आज 14 जून रोजी राज ठाकरे यांचा वाढदिवस आहे. मनसे नेते राजू पाटील,संदिप देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र नवनिर्माण महापालिका कामगार कर्मचारी सेनेचे उल्हासनगर महानगरपालिका युनिट अध्यक्ष दिलीप थोरात यांनी या वाढदिवसाला उल्हासनगरकरांना आगळावेगळा तोहफा देण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यासाठी श्रीराम चौकात असलेल्या भारत पेट्रोलीयम पंपावर जे दुचाकीस्वार त्यांच्या दुचाकीमध्ये पेट्रोल भरतील त्यावर प्रत्येक लिटरमागे 4 रुपये कमी घेण्यात येईल असे जाहीर केले होते.त्यास प्रचंड प्रमाणात प्रतिसाद मिळाला.

राज ठाकरे यांनी मनसेची कामगार संघटना काढल्यावर तीन वर्षांपूर्वी दिलीप थोरात यांची उल्हासनगर पालिका युनिट अध्यक्षपदी निवड केली होती.तेंव्हा थोरात यांनी अल्पावधीतच कामगारांना मनसेत समाविष्ट केले होते.त्याचे सकारात्मक पडसाद उमटले आणि तत्कालीन आयुक्त बालाजी खतगावकर यांच्या कालावधीत मनसे कामगार संघटनेला पालिकेत रितसर कॅबिन मिळाली होती.विशेष म्हणजे महाराष्ट्रात कोणत्याही महानगरपालिका मध्ये मनसे कामगार संघटनेला कॅबिन नसून उल्हासनगरात कॅबिन मिळाल्याने राज ठाकरे यांच्या अर्धांगिनी शर्मिला ठाकरे यांच्याहस्ते या कॅबिनचे उदघाटन करण्यात आले होते.

दरम्यान राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त दुचाकीस्वारांना 4 रुपये प्रति लिटरमागे पेट्रोल स्वस्त देण्यात आले आहे. दिवसभरात किती पेट्रोल विशेषतः दुचाकीस्वारांनी विकत घेतले त्याचे मोजमाप व देखरेख करण्यासाठी मुले तैनात असल्याची माहिती दिलीप थोरात यांनी दिली.

Web Title: rush on petrol pump for 4 rs discount in ulhasnagar