SIR
esakal
मुंबई : राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षणाचे (SIR-2026) काम सुरू असताना मतदार नोंदणी अधिकारी (ERO) आणि सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी (AERO) यांच्यासाठी महाराष्ट्र शासनाने मानधनासंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार नियमित कार्यरत ERO आणि AERO यांना वार्षिक मानधन देण्यास शासनाने मान्यता दिली आहे.