मुख्यमंत्री फडणवीस नीरव मोदी यांचे प्रतिरूप - सावंत

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 मे 2018

पालघर - निवडणुका आल्या की भरभरून मते मागायची. लोकांनी मते दिली की मात्र आश्‍वासनांपासून पळ काढायचा. ही मुख्यमंत्र्यांची पद्धत असून ते नीरव मोदी, विजय मल्ल्या यांचे राजकीय अवतार आहेत, अशी खरपूस टीका काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली. पालघरमध्ये काँग्रेस पोटनिवडणुकीच्या प्रचारादरम्यान ते बोलत होते. 

सावंत पुढे म्हणाले, ‘मुख्यमंत्र्यांनी सभेला पालघरमध्ये विकासकामांवर बोलण्याऐवजी केवळ दुःखाचा बाजार मांडला. मतदारांना केवळ भावनिक आवाहन मुख्यमंत्री करतात.’ या आधीच्‍या निवडणुकांमध्ये दिलेल्या आश्‍वासनांचे काय झाले, असा सवालही सावंत यांनी विचारला. महत्त्वाच्‍या समस्यांवर बोलण्यासाठी मुख्यमंत्र्याना वेळ नाही, असेही ते म्हणाले.

‘जमिनी विकून कर्ज फेडणार?’
पालघर मुख्यालय उभारणीसाठी सरकारकडे पैसे नसल्याने मोठ्या प्रमाणात जमिनीचे हस्तांतरण केल्याप्रकरणी दैनिक ‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्ताचा दाखलाही सावंत यांनी दिला. पालघरमधील जमिनी विकून सरकार राज्यावरचे कर्ज फेडणार का?, असा प्रश्‍नही त्यांनी केला आहे. सिडकोकडून या जमिनींची विक्री केली जाईल, असे त्‍यांंनी म्‍हटले.

Web Title: sachin sawant comment on devendra fadnavis