esakal | सचिन वाझेची NIA कोठडीत जाऊन भेट घेतली? चंद्रकांत पाटील म्हणतात...
sakal

बोलून बातमी शोधा

सचिन वाझेची NIA कोठडीत जाऊन भेट घेतली? चंद्रकांत पाटील म्हणतात...

सचिन वाझेच्या लेटरबॉम्ब प्रकरणामुळे अनिल परब अडचणीत येण्याची चिन्हं

सचिन वाझेची NIA कोठडीत जाऊन भेट घेतली? चंद्रकांत पाटील म्हणतात...

sakal_logo
By
टीम ई सकाळ

मुंबई: महाराष्ट्रात मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी लेटरबॉम्ब टाकला. तत्कालीन गृहमंत्र्यांवर त्यांनी पत्रातून गंभीर आरोप केल्याने अखेर अनिल देशमुखांना गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. हे प्रकरण ताजं असतानाच बुधवारी सचिन वाझेने एक लेटरबॉम्ब टाकत त्यात शिवसेना नेते अनिल परब यांच्यावर गंभीर आरोप केले. या मुद्द्यावर पत्रकार परिषदेत बोलताना, भाजप नेत्यांनीच सचिन वाझेला हे पत्र लिहीण्यास सांगितलं असून त्यात मुद्दाम मंत्र्यांची नावं लिहिण्यात आली आहेत आणि त्यासाठी भाजपचे चंद्रकांत पाटील सचिन वाझेला भेटले, असा आरोप अनिल परब यांनी केला होता. त्यावर आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उत्तर दिलं.

भाजपकडून शरद पवारांचे आभार तर नव्या गृहमंत्र्यांना इशारा

'१५ दिवसांत महाविकास आघाडीच्या आणखी दोन मंत्र्यांचे राजीनामे घेतले जातील', असा खळबळजनक दावा चंद्रकांत पाटील यांनी केला. याबद्दल बोलताना ते म्हणाले, "भाजपच्या लोकांना कोणत्या मंत्र्याचे नाव येईल हे कसं कळलं हा प्रश्न बाजूला ठेवूया. पण मी सचिन वाझेला भेटलो... ते देखील NIAच्या कोठडीत जाउन... आणि त्याला अनिल परब आणि शरद पवार यांची नावं लिहायला सांगितली, असा दावा करणं हीच मूळात हास्यास्पद बाब आहे. सचिन वाझेसाठी सभागृहाचं कामकाज ९ वेळा स्थगित करण्यात आलं होतं. आता तोच सचिन वाझे तुम्हाला नकोसा का झाला", असा सवाल भाजपने सरकारला विचारला.

१५ दिवसांत आणखी २ मंत्र्यांचे राजीनामे; भाजपचा खळबळजनक दावा

"सचिन वाझेने अनिल परब यांच्यावर आरोप केलेत. या आरोपानंतर त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तत्काळ राजीनामा द्यावा आणि चौकशीला सामोर जावं", असं चंद्रकांत पाटील म्हणाले. "राज्यातील सध्याच्या परिस्थितीवर मुख्यमंत्री मौन आहेत. ते पत्रांना उत्तर देत नाही. फोन उचलत नाहीत. अनिल परब गृहखात्यात ढवळाढवळ करतात अशी तक्रार स्वत: अनिल देशमुख यांनी शरद पवार यांच्याकडे केली असल्याचं समजतंय. सचिन वाझेने परब यांच्यावर केलेले आरोप गंभीर स्वरूपाचे आहेत. त्यामुळे मी असं म्हणू शकतो की मी वर्तवलेला अंदाज खरा ठरला. आता पुन्हा एकदा सांगतो की येत्या १५ दिवसात २ मंत्र्यांचे राजीनामे होणार आहेत", असा दावाही त्यांनी केला.

loading image