esakal | Sachin Waze Case: मनसुख हत्या प्रकरणात आला नवा ट्विस्ट
sakal

बोलून बातमी शोधा

Sachin Waze Case: मनसुख हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट

Sachin Waze Case: मनसुख हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट

sakal_logo
By
विराज भागवत

मुंबई: प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवसास्थानी सापडलेली स्फोटके तसेच मनसुख हिरेन हत्या प्रकरणी काही दिवसांपूर्वी तिसरी अटक करण्यात आली. पोलीस अधिकारी सुनील माने याला NIA ने अटक केल्यावर त्याचं निलंबन करण्यात आलं आणि त्याला 28 एप्रिलपर्यंत NIA कोठडी सुनावण्यात आली. NIA ने त्याची अधिक कसून चौकशी करत असताना या प्रकरणात नवा उलगडा झाला. मनसुख हत्या प्रकरणात अटकेत असलेला निलंबित पोलिस निरीक्षक सुनील मानेच्या चौकशीत मनसुखच्या हत्येवेळी माने घटनास्थळी उपस्थित असल्याचा संशय आता NIA ला आहे. कारण ४ मार्चला मनसुखच्या हत्येच्या आदल्या रात्री माने कुणालाही न सांगता स्वत:चा मोबाईल गुन्हे शाखा कार्यालयातच ठेवून बाहेर निघून गेला होता.

हेही वाचा: मनसुखच्या हत्येच्या वेळी सुनील माने तिथेच होता; NIAचा दावा

सचिन वाझेने पोलिसांच्या डोळ्यात धूळ फेकण्यासाठी आपला मोबाईल पोलिस कार्यालयातच ठेवला होता आणि लोकलने प्रवास करून ठाणे गाठलं होतं. तसंच मानेनेही तपासादरम्यान, तो हत्येच्या वेळी कार्यालयातच असल्याचे NIA अधिकाऱ्यांना सांगितलं होतं. मात्र त्यानेही मोबाईल कार्यालयात ठेवला आणि तो कार्यालयातून बाहेर पडला. त्यानंतर कार्यालयापासून काही अंतरावर उभ्या असलेल्या एका फोक्सवॅगन गाडीत बसून तो पुढे गेल्याचं दिसत आहे. म्हणूनच मोबाइलचे लोकेशन गुन्हे शाखा कार्यालय दिसत आहे, अशा संशय आहे.

हेही वाचा: अँटेलियाजवळ स्कॉर्पिओ ठेवताना कुठे होता सचिन वाझे, NIAला मिळाली मोठी माहिती

मानेच्या मोबाईलवरून तो कुठे होता याचा तपास करणं शक्य नसल्याने मानेचे दोन ऑडर्ली आणि दोन चालकांची NIA ने चौकशी केली. या चौघांच्या चौकशीतून NIAला माने त्या दिवशी नेमकं कुठे होता, हे जाणून घ्यायचं असावं. खरं तर सरकारी नियमानुसार जर सरकारी कर्मचाऱ्याला त्याला देण्यात आलेली सरकारी गाडी प्रवासासाठी वापरायची असेल, तर त्या गाडीच्या नंबरची आणि गाडी कोणत्या कामासाठी कुठे जाणार.. याची नोंद लॉगबुकमध्ये करावी लागते. त्यामुळे तपासासाठी NIA ने ते लॉगबुकदेखील स्वत:च्या ताब्यात घेतलं आहे. माने ज्या गाडीतून गेला, ती गाडी काही मिनिटांनी कळवा येथे गेली. त्याच ठिकाणी मानेच्या गाडीत वाझे पहिले रुमाल घेऊन आले. मानेने मनसुखला तावडेच्या नावाने करत बोलावून घेतले. कालांतराने त्यांनी मनसुखला दुसऱ्या गाडीत बसवले. त्याच गाडीतील आरोपींनी मनसुखची हत्या केली असण्याचा संशय NIAला आहे.

दरम्यान, NIA चा तपास अजूनही सुरू असून पुढचा पुरावा मिळेपर्यंत या प्रकरणात आणखी काय सत्य समोर येतं, ते पाहणं महत्वाचं असणार आहे.

loading image